शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब पाटील महामंडळाची उत्पन्न मर्यादा सहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 20:34 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कर्जासाठी वार्षिक उत्पन्नाची अट आता वाढवून सहा लाख रुपये

  विश्वास पाटील/ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 6 - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कर्जासाठी वार्षिक उत्पन्नाची अट आता वाढवून सहा लाख रुपये करण्यात आली आहे. सोमवारी शासनाने तसा आदेश काढला. राज्यात सकल मराठा समाजाचे गेल्या आॅक्टोबरमध्ये मोर्चे निघाले तेव्हा या महामंडळाचा कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. त्याचवेळी कौशल्य व उद्योजकता विकास मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी उत्पन्न मर्यादा वाढविण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार प्रत्यक्ष शासन आदेश निघाल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. या महामंडळातर्फे स्थापनेपासून एकच बीजभांडवल कर्ज योजना सुरूअसून, ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ४५ हजार (शहरांत ५५ हजार) रुपये आहे, त्यांनाच हे कर्ज मिळत होते. ग्रामीण भागात शेतमजुरालाही सरासरी १५० रुपये हजेरी मिळते. त्यामुळे एवढ्या कमी उत्पन्नाचा दाखलाच मिळत नसल्याने लाभार्थी हा पहिल्याच अटीमध्ये बसत नव्हता. त्यामुळे महामंडळाच्या लाभाचा दरवाजा तिथेच बंद होत होता. ही वस्तुस्थिती या वृत्तमालिकेत प्रामुख्याने मांडण्यात आली होती. त्याची दखल मंत्री निलंगेकर यांनीही घेतली होती व उत्पन्नाची अट सहा लाख रुपये करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार सोमवारी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसचिव सं. गि. पाटील यांनी हा शासन आदेश (क्रमांक : अपाम-२०१६ / प्रक्र१५४/ रोस्वरो-१) काढला. कर्ज योजनेची उत्पन्नाची अट अशी होती की त्यामुळे एकही अर्ज मंजूरच होणार नाही. ती अट शासनाने बदलली, परंतु मुख्यमंत्र्यांनी या महामंडळासाठी २०० कोटी रुपये देण्याची घोषणा अजून सत्यात उतरलेली नाही. हा निधी जर उपलब्ध झाला नाही, तर प्रकरणे दाखल होऊनही उपयोग होणार नाही. कारण या विभागाकडे निधीच नसेल तर कर्ज पुरवठा करणार कशातून, हा प्रश्न तयार होऊ शकेल. त्याशिवाय या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातही पुरेशी यंत्रणा व तज्ज्ञ मनुष्यबळ नाही. ती व्यवस्था केल्याशिवाय या महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ तरुणांना होणार नसल्याचे चित्र आहे.

उत्पन्न मर्यादा वाढविण्याची गरज होती, त्यानुसार शासनाने सुधारित आदेश काढला आहे. त्यानुसार एक एप्रिलपासून आम्ही कर्ज योजनांबाबत जनजागृती करण्यावर भर देऊ. जास्तीत जास्त तरुणांना महामंडळाच्या कर्ज योजनांचा कसा लाभ होईल असा प्रयत्न करू. - गं. अ. सांगडे, सहायक संचालक जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र