कोल्हापूरच्या अनिश गांधीला विजेतेपद

By Admin | Updated: September 7, 2015 00:04 IST2015-09-07T00:04:52+5:302015-09-07T00:04:52+5:30

चराटे स्मृती बुद्धिबळ : सातारचा ओंकार कडव दुसरा, आज पारितोषिक वितरण

Anish Gandhi of Kolhapur won the championship | कोल्हापूरच्या अनिश गांधीला विजेतेपद

कोल्हापूरच्या अनिश गांधीला विजेतेपद

सांगली : ए. डी. चराटे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिश गांधीने साडेसात गुणांची कमाई करीत विजेतेपद आपल्या नावे केले. एकता कला, क्रीडा मंडळ व नूतन बुद्धिबळ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पडसलगीकर भवनमध्ये स्पर्धा पार पडल्या. उद्घाटन राष्ट्रीय बुद्धिबळ पंच चिंतामणी लिमये आणि प्राचार्य रमेश चराटे यांनी पटावरील चाल खेळून केले. दीपक वायचळ यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी कुमार माने, विजय आपटे, सूर्याजी भोसले उपस्थित होते. स्पर्धेचा अंतिम निकाल असा : अनिश गांधी : कोल्हापूर (प्रथम), ओंकार कडव : सातारा (द्वितीय), पृथ्वीराज नार्वेकर : इस्लामपूर (तृतीय), श्रेयस पुरोहित : सांगली (चौथा), राजू सोनेचा : सांगली (पाचवा), सदानंद चोथे : सांगली (सहावा), उत्कर्ष लोमटे : कोल्हापूर (सातवा). पारितोषिक वितरण ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजाभाऊ शिरगावकर यांच्याहस्ते होणार आहे.

Web Title: Anish Gandhi of Kolhapur won the championship