शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांची शिरोळ पंचायत समितीवर ‘धडक’

By admin | Updated: July 1, 2015 00:13 IST

शनिवारी निर्णय : खासगी अंगणवाड्या बंद करण्याचे आश्वासन

शिरोळ : खासगी बालवाड्या तत्काळ बंद कराव्यात, अंगणवाडीसेविका व मदतनिसांना किमानवेतन कायदा लागू करावा, मानधनाच्या फरकाची रक्कम तत्काळ मिळावी, यासह विविध मागण्यांप्रश्नी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने मंगळवारी, शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात खासगी शाळांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी स्वरूपात बालवाड्या सुरू आहेत. प्रमुख १५ मागण्यांकरीता कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने अंगणवाडीसेविका व मदतनिसांनी येथील शिवाजी चौकातून मोर्चास सुरुवात केली. शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चा पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शिष्टमंडळ व उपसभापती वसंत हजारे, पं. स. सदस्य सर्जेराव शिंदे, प्रकल्प अधिकारी उदयकुमार कसुरकर यांच्यात बैठक झाली. चर्चेमध्ये तालुक्यातील खासगी बालवाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंगणवाडीसेविका व मदतनिसांची शनिवारी (दि. ४) बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मोर्चात जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे आप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कंदले, शमा पठाण, आरती लाटकर, सुनंदा टारे, विद्या कांबळे, मंगल माळी, अंजली श्रीसागर, सुनंदा कुऱ्हाडे, मंगल गायकवाड, शोभा भंडारे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडीसेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)