शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे मोबाईल फोन प्रशासनाची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST

कोल्हापूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी कार्यालयांमध्ये जमा केलेले मोबाईल फोन प्रशासनाची डोकेदुखी बनून ...

कोल्हापूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी कार्यालयांमध्ये जमा केलेले मोबाईल फोन प्रशासनाची डोकेदुखी बनून राहिले आहेत. हे सर्व मोबाईल संच सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर पडली असून राज्य पोषण संसाधन कक्ष आयुक्त रूबल अग्रवाल यांनी मोबाईल दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी सेविकेवर राहील असे एका पत्रानुसार स्पष्ट केले आहे.

सन २०१९ मध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविकेला ॲंन्ड्राॅईड बेस मोबाईल देण्यात आला होता. या मोबाईलच्या माध्यमातून अंगणवाडी स्तरावरील कामकाज ऑनलाईन पद्धतीने केले जात होते. मात्र, आता केंद्र शासनाने ‘पोषण ट्रॅकर’ ॲप्लिकेशनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये इंग्रजीमध्ये माहिती भरावी लागत आहे. तसेच मोबाईल नादुरूस्त होत आहेत. त्याचा दुरूस्तीचा खर्चही जादा सांगितला जात आहे. अशा तक्रारी करीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या १५ दिवसांत जिल्हावार आंदोलने करून मोबाईल तालुका आणि जिल्हा पातळीवर जमा केले आहेत.

हे सर्व जमा झालेले मोबाईल सुरक्षित ठेवणे अधिकाऱ्यांसाठी जिकिरीचे बनले आहे. याबाबत २ सप्टेंबर २०२१ रोजी संघटना कृती समितीसोबत बैठक झाली असून ३० ऑगस्टपूर्वी नादुरूस्त अथवा बंद पडलेले मोबाईल दुुरूस्त करून देण्याची जबाबदारी पुरवठाधारकांनी स्वीकारली आहे. त्यामुळे मोबाईल दुरूस्त करून घेणे ही सेविकेची जबाबदार असल्याने हे सर्व मोबाईल सेविकांना परत करावेत असे पत्र आयुक्त अग्रवाल यांनी बुधवारी पाठविले आहे. तशा सूचना तालुका पातळीवर करण्यात आल्या आहेत. तरीही सेविका दाद देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

चौकट

मोबाईल परत घेऊ नका

निकृष्ट मोबाईलला कंटाळून महाराष्ट्रातील ८० हजारांहून अधिक सेविकांनी मोबाईल परत केले आहेत. तरीही उच्चपदस्थ अन्यायी लादण्याची भूमिका घेणार असतील तर अंगणवाडी सेविकांनी याला प्रतिकार करावा. मानधन कपातीच्या पोकळ धमक्या देणाऱ्यांना भीक घालू नका. मोबाईल परत घेण्यास नकार द्या, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी केले आहे.