शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Local Body Election Results 2025: स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:20 IST

Kolhapur Nagaradhyaksha Winners Name List: नेत्यांनी स्थानिक सोयीच्या आघाड्या केल्याने राजकीय पक्षांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या

Kolhapur Nagaradhyaksha Winners List: जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपच्या २, शिंदेसेना २, जनसुराज्य पक्षाने २ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या  २ उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर उर्वरीत पाच ठिकाणी स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी मिरवणुका काढण्यावर प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र अनेक ठिकाणी समर्थकांनी जल्लोष साजरा करीत प्रशासनाचा आदेश धुडकावला.नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात २ डिसेंबरला चुरशीने ७८.८७ टक्के मतदान झाले होते. तेरा नगराध्यक्षपदासाठी ५६ उमेदवार व २५४ नगरसेवकपदांसाठीच्या ८०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. नेत्यांनी स्थानिक सोयीच्या आघाड्या केल्याने राजकीय पक्षांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या. ‘जयसिंगपूर’मध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजपचे सावकार मादनाईक यांच्या आघाडीला उद्धवसेनेने पाठिंबा दिला होता. याठिकाणी शाहू विकास आघाडीचे संजय पाटील यड्रावकर विजयी झाले. तेच भाजप शिरोळात मात्र आमदार पाटील यांच्याविरोधात ‘जनसुराज्य’चे आमदार अशोकराव माने यांच्या सोबत एकत्र आली होती. येथे शिवशाहू आघाडीच्या योगिता कांबळे (शिवशाहू आघाडी-पृथ्वीराज यादव,राजू शेट्टी,गणपतराव पाटील) विजयी झाल्या. ‘गडहिंग्लज’मध्ये काँग्रेस, शिंदेसेना, भाजप एकत्र लढले मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महेश तुरबतमठ यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली आहे. तर ‘हुपरी’ व ‘मूरगूड’, ‘चंदगड’मध्ये भाजप, शिंदेसेना एकत्र लढली होती. येथे चंदगडमध्ये भाजपचे सुनील काणेकर, हुपरीत मंगळराव माळगे तर मुरगूडमध्ये शिंदेसेनेच्या सुहासिनी पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मुरगूडमध्ये शिंदेसेना व भाजपच्या आघाडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उतरली होती. कागलात राष्ट्रवादी काँग्रेस व समरजीत घाटगे गटाच्या आघाडीसमोर शिंदेसेना उभी आहे. मात्र याठिकाणी मुश्रीफ-घाटगे गटाने विरोधकांचा धुव्वा उडवला. अन् राष्ट्रवादी-शाहू आघाडी सविता माने नगराध्यक्षपदी निवडून आल्या. आजऱ्यात भाजप-शिंदेसेना पुरस्कृत ताराराणी आघाडीचे अशोक चराटी विजयी झाले. त्यांच्यासमोर शिंदेसेना, भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेनेने आव्हान उभे होते. 

कोल्हापूर नगराध्यक्ष विजयी उमेदवार - (Kolhapur Nagaradhyaksha Winners Name List)

१.जयसिंगपूर : संजय पाटील यड्रावकर : शाहू विकास आघाडी२.मुरगूड : सुहासिनी पाटील : शिंदेसेना ३.कागल : सविता माने (राष्ट्रवादी-शाहू आघाडी)४.वडगाव : विद्याताई पोळ (काँग्रेस पुरस्कृत यादव आघाडी)५.शिरोळ : योगिता कांबळे (शिवशाहू आघाडी-पृथ्वीराज यादव,राजू शेट्टी,गणपतराव पाटील)६.पन्हाळा : जयश्री पोवार (जनसुराज्य पक्ष)७.गडहिंग्लज : महेश तुरबतमठ (राष्ट्रवादी)८.चंदगड : सुनील काणेकर (भाजप)९.कुरुंदवाड : मनीषा डांगे (शाहू आघाडी - यड्रावकर)१०.मलकापूर (जि.कोल्हापूर) : रश्मी कोठावळे : जनसुराज्य, भाजप, दलित महासंघ आघाडी)११.हातकणंगले : अजितसिंह पाटील (शिंदेसेना)१२.हुपरी : मंगळराव माळगे (भाजप)१३.आजरा : अशोक चराटी (भाजप-शिंदेसेना पुरस्कृत ताराराणी आघाडी..)

English
हिंदी सारांश
Web Title : Local Body Elections 2025: Local Alliances Dominate Kolhapur Municipal Results

Web Summary : Kolhapur's local body elections saw BJP win 2, Shinde Sena 2, and Janasurajya 1 Nagaradhyaksha post. Alliances dominated, with the Nationalist Congress Party and local fronts securing key victories in various municipalities and Nagar Panchayats.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५kolhapurकोल्हापूरMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसnagaradhyakshaनगराध्यक्ष