शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेच्या मोटारीतून दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : ‘अत्यावश्यक सेवा हुपरी नगरपरिषद’ असा फलक लावून देशी व विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या मोटारीचा शाहुपुरी पोलिसांनी ...

कोल्हापूर : ‘अत्यावश्यक सेवा हुपरी नगरपरिषद’ असा फलक लावून देशी व विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या मोटारीचा शाहुपुरी पोलिसांनी थरारक पाठलाग केला. ताराराणी चौकात पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी हुपरी नगरपरिषदेचे नगरसेवक दौलतराव पाटील यांचा मुलगा पृथ्वीराज पाटील याच्यासह चार संशयितांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली मोटारकार व साडेबारा हजारांची दारू, असा सुमारे २ लाख ६२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, पृथ्वीराज दौलतराव पाटील (वय २१, रा. पाटील गल्ली, अंबाबाई मंदिराशेजारी, हुपरी, ता. हातकणंगले), पोपट मारुती चौगले (३२, रा. जठारवाडी, ता. करवीर), प्रफुल्ल किरण लाड (२३, रा. हुपरी), शाहबाज फिरोज नायकवडे (२३, रा. कागल वेश, शाहू चौक, हुपरी).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी शनिवारी सायंकाळी शाहुपुरी पोलिसांची धैर्यप्रसाद चौकात नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू होती. त्यावेळी सर्किट हाऊसकडून एक लाल रंगाची मोटारकार भरधाव वेगाने आली. धैर्यप्रसाद चौकात पोलिसांनी ती अडवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने मोटार न थांबवता ताराराणी चौकाच्या दिशेने वेगाने पुढे गेली. त्यामुळे पोलिसांनी वायरलेसवरून संदेश देऊन त्या मोटारीचा थरारक पाठलाग केला, ही मोटार पोलिसांनी ताराराणी चौकात अडवली, त्यावेळी मोटारीतील युवकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी मोटारीची तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे साडेबारा हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या २४० बाटल्यांचे बॉक्स आढळले. पोलिसांनी ही दारू व गुन्ह्यात वापरलेली मोटारकार जप्त केली. मोटारीतील चौघांना पोलिसांनी अटक केली. ताराराणी चौकातील पोलीस चौकीत कारवाई करताना हुपरीतील संशयितांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. ही कारवाई शाहुपुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक स्मिता पाटील, पोलीस मानसिंग सातपुते, शैलेंद्र विभुते यांनी केली.

मोटारीवर अत्यावश्यक सेवा, प्रेस, मनसेचे फलक

जप्त केलेली मोटार ही पृथ्वीराज पाटील याच्या मालकीची आहे. या मोटारीच्या पुढे काचेवर कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती, हुपरी नगरपरिषद अत्यावश्यक सेवा, असा फलक लावलेला आहे. त्याशिवाय मोटारीच्या पुढे व मागे काचेवर इंग्रजीमध्ये प्रेस, मागील नंबरप्लेटवर मनसे व काचेवर मनसेचा झेंडा असल्याचे स्टिकर आहे. लॉकडाऊनमध्ये मोटारीतून दारूची चोरटी वाहतूक करता यावी, यासाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे.

फोटो नं.२२०५२०२१-कोल-पृथ्वीराज पाटील, पोपट चौगले, प्रफुल्ल लाड, शाहबाज नायकवडे (आरोपी दारू.)

फोटो नं.२२०५२०२१-कोल-कार०१

ओळ : जप्त केलेले दारूचे बॉक्स

फोटो नं.२२०५२०२१-कोल-कार०२

ओळ : दारूच्या चोरट्या वाहतूकप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पाठलाग करून पकडलेली मोटारकार.

===Photopath===

220521\22kol_12_22052021_5.jpg~220521\22kol_13_22052021_5.jpg

===Caption===

फोटो नं.२२०५२०२१-कोल-पृथ्वीराज पाटील, पोपट चौगले, प्रफुल्ल लाड, शाहबाज नायकवडे (आरोपी दारु)फोटो नं.२२०५२०२१-कोल-कार०१ओळ : जप्त केलेले दारुचे बॉक्सफोटो नं.२२०५२०२१-कोल-कार०२ओळ : दारुच्या चोरटी वाहतुक प्रकरणी शाहूपूरी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पाठलाग करुन पकडलेली मोटारकार.~फोटो नं.२२०५२०२१-कोल-पृथ्वीराज पाटील, पोपट चौगले, प्रफुल्ल लाड, शाहबाज नायकवडे (आरोपी दारु)फोटो नं.२२०५२०२१-कोल-कार०१ओळ : जप्त केलेले दारुचे बॉक्सफोटो नं.२२०५२०२१-कोल-कार०२ओळ : दारुच्या चोरटी वाहतुक प्रकरणी शाहूपूरी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पाठलाग करुन पकडलेली मोटारकार.