Kolhapur: अन् ‘अजितदादां’नी फेटा बांधलाच नाही, नेमकं काय होतं कारण.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:57 IST2026-01-29T12:55:41+5:302026-01-29T12:57:57+5:30

'एक नव्हे हजार फेटे बांधीन’

Ajit Pawar did not even tie a turban at the civic felicitation ceremony of Adkur in Kolhapur | Kolhapur: अन् ‘अजितदादां’नी फेटा बांधलाच नाही, नेमकं काय होतं कारण.. वाचा सविस्तर

Kolhapur: अन् ‘अजितदादां’नी फेटा बांधलाच नाही, नेमकं काय होतं कारण.. वाचा सविस्तर

राम मगदूम

गडहिंग्लज : ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही ‘गडहिंग्लज-चंदगड’शी अतूट नाते होते. तत्कालीन आमदार राजेश पाटील यांचा पराभव जिव्हारी लागल्याने अडकूरच्या नागरी सत्कार सोहळ्यात त्यांनी फेटा बांधलाच नाही. त्यावेळी म्हणाले होते..‘मी चंदगडला भरभरून दिले..तरीही माझ्या शिलेदाराचा पराभव झाल्याचे शल्य आहे. त्यांना पुन्हा आमदार करा, एक नव्हे हजार फेटे बांधीन’.

भाजपसोबत ते सत्तेत सहभागी झाले त्यावेळी राजेश पाटीलही त्यांच्यासोबत गेले. संध्यादेवी कुपेकर शरद पवार यांच्या पाठिशी राहिल्या. परंतु, चंदगड नगरपंचायतीच्यानिमित्ताने राजेश पाटील व नंदिनी बाभूळकर यांनी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. किंबहुना, राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची ‘नांदी’ चंदगडमधूनच झाली. त्याबद्दल त्यांनी राजेश पाटील यांचे विशेष कौतुकही केले होते. 

Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला

१० फेब्रुवारी २०२४ रोजी नूल येथील सुरगीश्वर मठ सांस्कृतिक भवन आणि चंदगड नगरपंचायत इमारत भूमीपूजननिमित्ताने ते गडहिंग्लजला आले होते. त्यावेळी आजºयातील नियोजित किटवडे धरण बांधून गडहिंग्लज पूर्वभागाच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या शब्दही त्यांनी शेतकºयांना दिला होता.

चंदगडकरांनी सत्कार केला आणि विरोधी पक्षनेत्याचा उपमुख्यमंत्री झालो. तुमच्या सत्काराने आणखी कांहीतरी मोठं माझ्या पदरी पडू शकते, अशी मिश्किल टीपणीही त्यांनी केली होती. 
१७ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेच्या नेसरीतील प्रचारसभेत पर्यटनातून विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी चंदगडला दुप्पट निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तद्वत, दौलत खाली करा, आम्ही चालवतो, असा इशाराही त्यांनी विरोधी उमेदवार मानसिंग खोराटेंना देत राजेशना मोठी ताकद दिली होती. तरीही पराभव झाल्यानंतर ‘राजेश काळजी करू नका, चंदगडची बांधणी नव्याने करा’ या शब्दात धीरही दिला होता.  

वाचा: अजितदादांचे सडोली खालसाच्या माळावर कोल्हापुरातील अखेरचे भाषण, आठवणीने कार्यकर्ते गहिवरले

अजितदादा व राजेश पाटील यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे दादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आपला वाढदिवस जाहीरपणे साजरा करणार नाही, असे राजेश यांनी महागावमध्ये जाहीर केले होते. विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यास ‘चंदगड-गडहिंग्लज’मधून दोन आमदार देण्याचा शब्द त्यांनी अजितदादांना अडकूरच्या सभेत दिला होता.

कागल तालुक्याशी ऋणानुबंध

कागल : पवार कुटुंबीय आणि कागल तालुक्याचे नाते गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ अतुट राहीले आहे . पाझर तलाव मिनी गोवा पर्यटन केंद्र उद्घाटन सोहळ्यासाठी ते आले होते. त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम महायुतीची उमेदवारी मुश्रीफांना जाहीर केली होती. मंत्री मुश्रीफांनी अनेकदा सांगितले आहे की, त्यांना मी माझे नवीन घरही दाखविले नाही कारण त्यांना यामध्ये अनेक त्रुटीच दिसतील व ते स्पष्टपणे सांगतीलही. कागलमधील श्रीराम मंदिर पाहताना त्यांनी खांबांची संख्या कमी करता आली असती हे सांगताना छताचे वजन आणि पिलर संख्या याचे गणित मांडून दाखविले. दोन वर्षापूर्वी 28 जानेवारी 2024 रोजी मौजे सांगाव येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित होते. याआठवणीने कागलकरांना सुन्न केलं.

Web Title : अजित पवार का कोल्हापुर दौरा: उन्होंने 'फेटा' पहनने से क्यों इनकार किया

Web Summary : अजित पवार का गडहिंग्लज-चंदगढ़ से गहरा नाता था। एक वफादार की हार से निराश होकर, उन्होंने 'फेटा' पहनने से इनकार कर दिया, और वादा किया कि अगर उनका आदमी फिर से जीता तो पहनेंगे। उन्होंने विकास निधि का वादा किया और क्षेत्र के साथ घनिष्ठ संबंध बनाए रखा।

Web Title : Ajit Pawar's Kolhapur Visit: Why He Refused to Wear a 'Feta'

Web Summary : Ajit Pawar's bond with Gadhinglaj-Chandgad was strong. Disappointed by a loyalist's defeat, he refused a 'Feta', promising one if his man won again. He pledged development funds and maintained close ties with the region.