शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बेबी पाटणकर ताब्यात

By admin | Updated: May 10, 2015 00:43 IST

अमली पदार्थ साठा प्रकरण : पाच दिवसांची कोठडी

खंडाळा : कण्हेरी (ता. खंडाळा) येथून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ साठ्यातील मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर अखेर खंडाळा पोलिसांच्या जाळ्यात अडकली. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचा मार्ग मोफत झाला असून, मॅफिडॉन प्रकरणाचा उलगडा लवकरच होणार आहे. बेबी पाटणकर हिला खंडाळा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कण्हेरी येथे मुंबई पोलिसातील हवालदार धर्मराज काळोखे याच्याकडे सुमारे २२ कोटींचा ११२ किलो मॅफिडॉन पोलिसांनी छापा टाकून जप्त केला होता. धर्मराज काळोखे याचा कसून तपास केला असता मुंबईस्थित बेबी पाटणकर ही मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून खंडाळा पोलिसांनी बेबी पाटणकराचा शोध सुरू केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तेथे सापडलेल्या १२ किलो अमली पदार्थाच्या गुन्ह्यात बेबी पाटणकरला अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बेबी पाटणकरला या गुन्ह्यात खंडाळा पोलीस पथकाने ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दीपक हुंबरे, एस. एस. गोडबोले, एस. टी. बारेला, गुन्हेअन्वेषणचे भिसे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास खंडाळा पोलिसांकडून सुरू आहे. (प्रतिनिधी)