शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

‘अतिरिक्त शिक्षकेतर’ आॅफलाईनवर

By admin | Updated: November 28, 2014 00:03 IST

शासनाशी संघर्षाची संघटनांची तयारी : जिल्ह्यात १२५६ जण अतिरिक्त, आॅफलाईनला विरोध

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १२५६ जण अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त शिक्षक, कर्मचारी यांचा पगार काढण्यासाठी आॅफलाईन पद्धतीने माहिती न दिल्यास संबंधित शाळेतील सर्वच शिक्षकांना पगारापासून वंचित राहावे लागणार आहे. यामुळे अतिरिक्तचा पगार आॅफलाईन घ्या, अन्यथा सर्वांचाच पगार थांबणार, असा प्रेमळ सल्ला जिल्हा शिक्षण प्रशासन देत आहे. याला शिक्षण संस्थाचालकांचा व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. आॅफलाईनच्या मुद्द्यावरून संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात ९१२ संस्था आहेत. यामध्ये सध्या तीन हजार ७२७ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. हक्काचे शिक्षण कायद्यानुसार पटसंख्येनुसार जिल्ह्यात अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन झाले आहे. दरम्यान, एप्रिल २०१३ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक व सैनिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृतिबंधाचा आदेश काढला. याच्याविरोधात काही संघटना न्यायालयात गेल्या आहेत; परंतु, नव्या आदेशाची अंमलबजावणी सुरूच आहे. यानुसार जिल्ह्यात एकूण शिपायांच्या ११५९, अर्धवेळ ग्रंथपालांच्या १८, पूर्णवेळ ग्रंथपालांच्या ११, प्रयोगशाळा सहायकांच्या ७, कनिष्ठ लिपिक ३, वरिष्ठ लिपिक ४१, मुख्य लिपिक एक असे अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्तमध्ये सर्वाधिक शिपाई आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार शालार्थ प्रणाली (आॅनलाईन) न करता आॅफलाईनने करण्याच्या सूचना शासनाने १४ आॅक्टोबर २०१४ रोजी दिल्या आहेत. यानुसार जिल्हा शिक्षण विभागाने सर्व शाळांपर्यंत ही माहिती पोहोचवल्यानंतर खळबळ माजली आहे. चालू महिन्यात अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती आॅफलाईनवर न दिल्यास संंबंधित शाळेतील सर्वच शिक्षकांचे पगार थांबणार आहेत. यामुळे आतापासूनच शासनावर दबाव टाकून आॅफलाईनची सक्ती मागे घेण्यासाठी संघटना आग्रही आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले आहे; पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. समायोजन होऊनही अतिरिक्त ठरल्यास त्या कर्मचाऱ्याचे पुढे काय, यासंबंधी स्पष्ट आदेश नाहीत. आॅफलाईनेही अतिरिक्तना पगार दिला जात आहे. मात्र, कायमचेच अतिरिक्त राहिल्यास नोकरी गमावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही; म्हणूनच आॅफलाईनला विरोध वाढत आहे. आॅफलाईनची सक्ती आणि आॅक्टोबर २०१४ च्या आदेशातील जाचक अटी रद्द कराव्यात; अन्यथा शाळा बंद आंदोलन करावे लागेल. शासनाने यांची गांभीर्याने नोंद घ्यावी.- एस. डी. लाड, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठकामावरूनही ‘आॅफ’ची भीतीमहाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती नियमावली १९८१ अनुसार सेवाज्येष्ठता, मागासवर्गीय अनुशेष यांचा विचार करून संस्थांनी त्वरित अतिरिक्त शिक्षक, कर्मचारी यांच्या रिक्त जागांवर पात्र असलेल्यांची बदली व बढती करावी. ही प्रक्रिया करूनही अतिरिक्त ठरणाऱ्यांचा आॅफलाईन पद्धतीने पगार काढण्यासाठी माहिती द्यावी, असे आवाहन शिक्षण प्रशासनाने केले आहे. मात्र, आता आॅफलाईनचे पगार काढण्यासाठी माहिती दिल्यास अतिरिक्तांना कायमचे कामावरून कमी (आॅफ) करतील, अशीही भीती वाटत आहे.