शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते महेश कोठारे यांना ‘नटश्रेष्ठ दानवे कलायात्री पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा अकरावा ‘कलायात्री पुरस्कार’ निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा अकरावा ‘कलायात्री पुरस्कार’ निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना शुक्रवारी जाहीर झाला. शाहू स्मारक भवनात १ मार्चला सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बालवयापासून हिंदी व मराठी सिनेसृष्टी गाजविणारे अभिनेते आणि धुमधडाका, दे दणादण, थरथराट, झपाटलेला असे अनेक मराठी चित्रपटांतील कलाकार, दिग्दर्शक तसेच जय मल्हार, विठू माऊली आणि दख्खनचा राजा जोतिबा अशा मालिकांचे कोठारे निर्माते आहेत. पुरस्कार वितरणानंतर कमला कॉलेजचे प्रा. डॉ. सुजय पाटील त्यांची मुलाखत घेणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक जयश्री दानवे, राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर यांनी दिली आहे.

गेली ३५ वर्षे वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जयशंकर दानवे या कलाकाराचे स्मरण दानवे परिवारातर्फे केले जाते. २०११ पासून हे कलायात्री पुरस्कार सुरू झाले असून, हा पुरस्कार नाटक, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमातील रंगकर्मींना देण्यात येतो. आजपर्यंत दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर यांना हा पुरस्कार दिला आहे.

(संदीप आडनाईक)

===Photopath===

190221\19kol_1_19022021_5.jpg

===Caption===

19022021-kol-mahesh kothare purskar.jpg