शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रायगडाकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:04 IST

राज्यभरातून सहा लाखांहून अधिक शिवप्रेमी उपस्थित राहणार

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शुक्रवार, ६ जून रोजी रायगडावरशिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी सुरू आहे. पूर्वतयारीसाठी एकूण चार खासगी बसमधून सुमारे चारशे कार्यकर्ते मंगळवारपर्यंत रायगडावर दाखल झाले आहेत. या सोहळ्याला राज्यभरातून सहा लाखांहून अधिक शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत, असा अंदाज आहे.

रायगडावर जाणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड, पंढरपूर तसेच कोकणातून एसटी बसची व्यवस्था केलेली आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तयारी पूर्ण केली आहे. रायगडाच्या पायथ्याला पाचाड येथील जिजामाता यांच्या वाड्याजवळील कवडीचा माळ येथे वाहनतळ उभारले आहे. येथे दोन मोठे वाहनतळ तयार केले आहेत. तेथे बसने शिवप्रेमींना आणून सोडले जाणार आहे.

वाहनतळावरून गडाच्या पायथ्यापर्यंत शिवप्रेमींना नेण्यासाठी ३०० एसटी बसची व्यवस्था, पाच ठिकाणी अन्नछत्र उभारले आहे. याशिवाय मंडप उभारणी, ध्वनियंत्रणा, स्नानगृह, स्वच्छतागृहांची मोठी व्यवस्था केली आहे. एमटीडीसीमध्ये महिलांच्या निवासाची सोय केली आहे. शिवभक्त नियंत्रण समितीत काम करण्यास इच्छुक हजारो स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी समितीच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे.

ढोलपथक, तुतारी, हलगीवादक जाणार

रायगडावरील या सोहळ्यासाठी ढोलपथक, तुतारी, सनई-चौघडे, लेझीम पथक, झांज पथक, हलगीवादक तसेच मर्दानी खेळाचे आखाडे जाणार आहेत. त्याची तयारी सुरू आहे. फुलांच्या सजावटीसाठी फुले घेऊन जाणारे कार्यकर्ते गडावर पोहोचले आहेत.

टी शर्ट, स्टीकर्सची व्यवस्था

रायगडावरील या सोहळ्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या-त्या जिल्ह्यातून स्वतंत्र टी शर्ट, झेंडे तसेच स्टीकर्स देण्यात आले आहेत. स्टीकर्समुळे खासगी वाहनातून येणाऱ्या शिवप्रेमींना टोलनाक्यावर अडविले जाणार नाही. टोलशिवाय या कार्यकर्त्यांना गडावर पोहोचणे सोयीचे जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगड