मराठा प्राधिकार निगम मंडळ कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:02+5:302021-09-14T04:30:02+5:30

बेळगाव : गांधी जयंतीपर्यंत कर्नाटक राज्यातील मराठा समाजाचा २ अ मध्ये समावेश करावा आणि मराठा प्राधिकार निगम मंडळ कार्यान्वित ...

Activate the Maratha Authority Corporation Board | मराठा प्राधिकार निगम मंडळ कार्यान्वित करा

मराठा प्राधिकार निगम मंडळ कार्यान्वित करा

बेळगाव : गांधी जयंतीपर्यंत कर्नाटक राज्यातील मराठा समाजाचा २ अ मध्ये समावेश करावा आणि मराठा प्राधिकार निगम मंडळ कार्यान्वित करावे, यासह श्रीमंत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती करावी, अन्यथा ३ ऑक्टोबरपासून एकाचवेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा कर्नाटक सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे राज्यातील मराठा समाजाचा मेळावा आयोजित केला होता. राज्यातील दोन हजारहून अधिक मराठा बांधव उपस्थित होते. औरंगाबाद महाराष्ट्र येथून मराठा समाजाचे अंकुश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार माजी मंत्री श्रीमंत पाटील, आमदार अंजली निंबाळकर, यशवंत जाधव दावणगेरे, डॉ. सोनाली सरनोबत, किरण जाधव उपस्थित होते.

Web Title: Activate the Maratha Authority Corporation Board