शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला रिंगरोडसाठी कृती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST

निर्णय : लोकसहभागातून प्रश्न मार्गी लावणार गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील रखडलेला रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिंगरोड कृती समिती ...

निर्णय : लोकसहभागातून प्रश्न मार्गी लावणार

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील रखडलेला रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिंगरोड कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. हद्दवाढ मंजुरीप्रमाणे गडहिंग्लजच्या रखडलेल्या रिंगरोडचा प्रश्न सोडविण्याचा एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत आज, शुक्रवारी झाला.

येथील यशवंत बझारमध्ये ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी किसनराव कुराडे होते. हद्दवाढ कृती समितीचे अध्यक्ष डॉ. एम. एस. बेळगुद्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुराडे म्हणाले, लोकसहभाग आणि कृती समितीच्या माध्यमातूनच रिंगरोडचा प्रश्न मार्गी लागेल.

बेळगुद्री म्हणाले, एडीडीपीआरच्या चुकांमुळेच अनेक ठिकाणी वाद व गुंता निर्माण झाला आहे. भूसंपादनासाठी संबंधित शेतकरी व नागरिकांचीही व्यापक बैठक घ्यावी लागेल.

किरण कदम म्हणाले, सध्या ताब्यात असणार्‍या रस्त्याचा विकास तातडीने करायला हवा.

भरपाई आणि पर्यायी जागा याची माहिती संबंधित शेतकर्‍यांना द्यावी.

नगरसेवक बसवराज खणगावे व नरेंद्र भद्रापूर यांनी याकामी नगरपालिकेचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे सांगितले.

चर्चेत बसवराज आजरी, नागेश चौगुले, रश्मीराज देसाई, अशोक खोत यांनीही भाग घेतला.

बैठकीस रमेश रिंगणे, रमजान अत्तार, महेश सलवादे, विरुपाक्ष पाटणे, विश्वास खोत, बाळासाहेब सुतार, राजकुमार कदम, सुमित धाकोजी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप माने यांनी आभार मानले.

----- गडहिंग्लज येथील सर्वपक्षीय बैठकीत डॉ. एम. एस. बेळगुद्री यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किसनराव कुराडे, किरण कदम, बसवराज खाणगावे, सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते.