शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

आबिटकर गटाचा विरोधी आघाडीला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर दोन रुपये वाढ देण्यासाठी आणि ‘गोकुळ’मधील सहकार मोडीत काढण्याचा घाट ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी :

शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर दोन रुपये वाढ देण्यासाठी आणि ‘गोकुळ’मधील सहकार मोडीत काढण्याचा घाट घातलेल्या मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी चाललेल्या लढाईत आमदार प्रकाश आबिटकर गटाने शाहू आघाडीला दिलेल्या पाठिंब्यामुळे विजयाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधी राजर्षी शाहू आघाडीला आणखी बळकटी मिळाली असल्याचा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. गारगोटी येथे आमदार आबिटकर यांच्या गटाने आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या पाठिंबा बैठकीत ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत खासदार संजय मंडलिक, विश्वासराव पाटील, मारुतराव जाधव होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत जाहीर केला.

प्रारंभी ज्येष्ठ नेते मारुतराव जाधव यांनी प्रास्ताविकात भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना बाजूला करून स्वाभिमानी दूध उत्पादकांची सत्ता आणण्यासाठी राजर्षी शाहू आघाडीच्या प्रयत्नाला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी या आघाडीच्या पाठीमागे उभे राहावे, अशी भूमिका मांडली.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ निवडणुकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व ठरावधारक यांनी एकसंध राहण्याची भूमिका घेतली. निर्णयाला थोडा उशीर झाला असला तरी स्वाभिमानी दूध उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच महाविकास आघाडीसोबत राहण्याची आमची भूमिका राहिलेली आहे. गेल्या ५ वर्षांपूर्वी मल्टीस्टेटला विरोध करून हा संघ सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या ताब्यात राहावा यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रयत्नामुळेच आज आपणास मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. यावेळचे मत आपले हक्क शाबूत ठेवणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी द्यावयाचे आहे असे सांगून या आघाडीसोबत राहण्याचे जाहीर केले.

खासदार मंडलिक म्हणाले, गेल्या दहा दिवसांपासून आमदार आबिटकर यांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, पण त्यांचा निर्णय आपल्याबरोबरच असेल याची मला खात्री होती. आमदार आबिटकर यांच्या निर्णयामुळे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीचाच विजय होईल यात शंका नाही. आपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्नशील राहूया, असे आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ नेते बी. एस. देसाई, ‘गोकुळ’चे माजी चेअरमन विश्वास पाटील, के. जी. नांदेकर, नंदकुमार ढेंगे, विश्वनाथ पाटील, शामराव भावके, दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, अरुण जाधव, अभिजित तायशेटे, नंदकुमार सूर्यवंशी, जितेंद्र टोपले, अशोक फराकटे, पांडुरंग पाटील, प्रकाश पाटील, अजित देसाई, अशोक वारके, विलास पाटील, सभापती कीर्ती देसाई, उपसभापती सुनील निंबाळकर, सरपंच धनाजी खोत, बी. डी.भोपळे, आदी प्रमुख कार्यकर्ते, ठरावधारक उपस्थित होते.

फोटो ओळ

राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील हे आमदार आबिटकर यांचा सत्कार करताना. सोबत खासदार मंडलिक, मारुतराव जाधव, बी. एस. देसाई, विश्वास पाटील, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेट्टी, प्रकाश पाटील,धनाजी खोत आदी.

जाधव गुरुजीची कोपरखळी

चौकट

दरवर्षी हुंडा देणारे सासरे

वर्षाला चार-चार कोटी हुंडा आपल्या जावयांना मिळवून देण्यासाठी नरके आणि महाडिक यांनी पुण्यात कोल्ड स्टोअरेजचा ठेका जावयांच्या कंपनीला दिला आहे. संपूर्ण वर्षाचा खर्च साडेतीन कोटी रुपये अपेक्षित असताना वार्षिक अकरा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च ताळेबंदमध्ये दाखवला जातो.