शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातील दारु दुकानांना अभय

By admin | Updated: June 20, 2017 18:43 IST

मनपा सभेत वादग्रस्त रस्ते हस्तांरणाचा ठराव बहुमताने मंजूर, अभूतपूर्व गोंधळ, मानदंड पळविण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २0 : शहरातील प्रमुख पाच रस्त्यावरील बंद झालेल्या मद्य विक्रीस प्रत्यक्ष प्रोत्साहन देणारा रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यावरून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळा झाला. सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांच्या समोर ठाकल्याने तब्बल पाच तास शाहू सभागृह जणू कुस्तीचा आखाडाच बनले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह धक्काबुक्की, जोरदार घोषणाबाजी आणि मानदंड पळविण्याचा प्रयत्नामुळे सभागृहाच्या कामकाजाचा एक नवा इतिहास लिहिला गेला. ज्याच्यासाठी गोंधळ उडाला तो रस्ते हस्तांतराचा वादग्रस्त ठराव सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमताने जिंकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शहरातून जाणाऱ्या चार राज्य मार्ग व एक राष्ट्रीय मार्गावरील ८९ मद्य विक्रीची दुकाने बंद झाली आहेत. ती चालू करता यावीत म्हणून महापालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीतर्फे हे पाच रस्ते ताब्यात घेण्याचा ठराव मांडला होता. त्यास भाजप - ताराराणी आघाडीने तीव्र विरोध केला. सभागृहात झालेला हा विरोध मोडून काढत सत्तारुढ आघाडी सदस्यांनी बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करुन घेतलाच शिवाय टीकेचे धनीही बनले. ठरावाला विरोध करताना सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. ‘दारुबंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी सभागृह दुमदुमले. त्याचवेळी विरोधकांना सत्तारुढ सदस्यांनीही ‘रस्ते हस्तांतर झालेच पाहिजे’ अशा घोषणा देत जोरदार प्रत्युत्तर दिले. या घोषणाबाजीवेळी सत्तारुढ सदस्य प्रतापसिंह जाधव यांनी विरोधी गटाच्या कमलाकर भोपळेंना धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. कोण काय बोलतोय हे कळत नव्हते एवढा आरडा ओरड सुरु होती. शेवटी महापौर हसीना फरास यांनी अर्ध्या तासाकरीता सभागृह तहकुब केले.