Kolhapur Accident News: स्पर्धा परीक्षेचे स्वप्न भंगले, गगनबावडा मार्गावर तरुणाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:41 IST2026-01-22T11:41:13+5:302026-01-22T11:41:24+5:30

दुचाकीला टेम्पोची समोरासमोर धडक, एक गंभीर जखमी 

A youth was killed after a two-wheeler collided head on with a goods transport tempo in the Khupire Wakare area on the Kolhapur Gaganbawda road | Kolhapur Accident News: स्पर्धा परीक्षेचे स्वप्न भंगले, गगनबावडा मार्गावर तरुणाचा अपघाती मृत्यू

Kolhapur Accident News: स्पर्धा परीक्षेचे स्वप्न भंगले, गगनबावडा मार्गावर तरुणाचा अपघाती मृत्यू

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरे-वाकरे हद्दीत दुचाकीची मालवाहतूक टेम्पोला समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

सौरभ संजय सुतार (वय २४, रा. खुपिरे, ता. करवीर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे, तर त्याचा मित्र आकाश सर्जेराव सुतार (२४, रा. शिंदेवाडी) हा गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाला. पोलिस पाटील सविता गुरव यांनी अपघाताची माहिती करवीर पोलिसांना दिली. अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी़, खुपिरे येथील सौरभ सुतार व त्याचा मित्र आकाश सुतार हे दोघे दुचाकीवरून कुंभी-कासारी कारखान्यावरून खुपिरेकडे निघाले होते. याचवेळी कोल्हापूरहून गोव्याकडे छोटा मालवाहतूक टेम्पो जात होता. साडेअकराच्या दरम्यान कोल्हापूर-गगनबावडा मुख्य मार्गावर पेट्रोल पंपासमोर दुचाकीची मालवाहतूक टेम्पोला जोरात धडक झाली. यामध्ये सौरभ सुतार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली, तर त्याचा मित्र आकाश सुतार हाही गंभीर जखमी झाला.

तातडीने दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी १०८ ॲम्बुलन्समधून कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच सौरभ सुतारचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात आईवडील, भाऊ असा परिवार आहे.

कुटुंबावर आभाळ कोसळले

सौरभ सुतार हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील सुतारकाम करतात. आज त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने हाताशी आलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने सुतार कुटुंबावर आभाळ कोसळले.

Web Title : कोल्हापुर: दुर्घटना में सपने टूटे; गगनबावड़ा मार्ग पर युवक की मौत।

Web Summary : कोल्हापुर के पास गगनबावड़ा मार्ग पर एक दुर्घटना में एक युवक की मौत हो गई, जब उसकी मोटरसाइकिल एक टेम्पो से टकरा गई। मृतक सौरभ सुतार प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहा था। एक अन्य युवक गंभीर रूप से घायल हो गया।

Web Title : Kolhapur: Accident ends dreams; youth dies on Gaganbawda road.

Web Summary : A young man died in an accident near Kolhapur on the Gaganbawda road after his motorcycle collided with a tempo. The deceased, Saurabh Sutar, was preparing for competitive exams. Another youth was seriously injured.