शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तमदलगेच्या डोंगरावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन निमशिरगावच्या तरुणाचा खून, एक संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:44 IST

शिरोळ तालुक्यात पंधरा दिवसांत तिसरा खून

जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून तमदलगे येथील बसवान खिंडीत असणाऱ्या डोंगरावर खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अविनाश ऊर्फ दीपक ओमगोंडा पाटील (वय ३५, रा.सांगली बायपास रोड निमशिरगाव) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास खून झाल्याची शक्यता आहे.फिरायला जाणाऱ्या नागरिकांना मोटारसायकल उभी असल्याची दिसली. तेथूनच पुढे वीस फूट अंतरावर मृतदेहदेखील दिसून आला. घटनेची माहिती पोलिस पाटील अमोल कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मृत अविनाश याच्या पायातील चप्पल तसेच होते. यावरून खुनाच्या वेळी झटापट झाली असावी, असे चित्र होते. तीक्ष्ण हत्याराच्या माऱ्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असे दिसून आले. घटनेचे गांभीर्य घेऊन पोलिसांनी तातडीने कुटुंबीयांसह मित्रपरिवाराकडे चौकशी करून तपास गतिमान केला. याप्रकरणी एका संशयिताला तपासासाठी ताब्यात घेतले आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. अविनाश याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके म्हणाले, घटनेची चौकशी सुरू असून लवकरच खुनाचे कारण व संशयितांना अटक केली जाईल.

डोक्यात वर्मी घावतमदलगे हद्दीतील डोंगर परिसर निर्मनुष्य आहे. त्यामुळे घटना घडत असताना कोणालाही याची पुसटशीही कल्पना आली नाही. त्यामुळे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे पुढे आले आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून खून झाला असावा, अशी शक्यता गृहित धरून पोलिस तपास करत आहेत.

पंधरा दिवसांत तिसरा खूनशिरोळ तालुक्यात शिरोळ, हरोलीनंतर आता तमदलगे येथे खुनाची घटना घडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुका चर्चेत आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस