Kolhapur: शिक्षक महिलेसोबत सापडला, नातेवाइकांनी बेदम चोपला; नग्नावस्थेत दोरीने घरातच डांबून ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:04 IST2025-11-29T12:01:25+5:302025-11-29T12:04:10+5:30
काहींनी हा प्रकार मिटविण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त नातेवाइकांनी गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिले

Kolhapur: शिक्षक महिलेसोबत सापडला, नातेवाइकांनी बेदम चोपला; नग्नावस्थेत दोरीने घरातच डांबून ठेवले
कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे एक शिक्षक महिलेसोबत सापडल्याने नातेवाइकांनी त्याला बेदम मारहाण करत घरातच डांबून ठेवले. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी शहरातील नामांकित शाळेत शिक्षक असणाऱ्या या तरुणाचे महिलेशी अनैतिक संबंध होते. नातेवाइकांनी वारंवार ताकीदही दिली होती. शुक्रवारी महिलेच्या घरात तो सायंकाळी सातच्या सुमारास आला. महिलेसोबत सापडल्याने त्याला पकडून बेदम मारहाण करून नग्नावस्थेत दोरीने बांधून घरातच डांबून ठेवले.
ही घटना समजताच नागरिकांनी घरासमोर मोठी गर्दी केली होती. काहींनी हा प्रकार मिटविण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त नातेवाइकांनी गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिले. जमाव मोठा असल्याने व तणावाचे वातावरण असल्याने शिरोळ पोलिस मोठा बंदोबस्त घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जमावाला हटवून व महिलेच्या नातलगांची समजूत काढत सुमारे तीन तासांनी त्या शिक्षकाला जमावाच्या तावडीतून सुटका करून पोलिस ठाण्यात नेण्यात आले.