वारंवार फोन अन् मेसेज, केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन; कोल्हापुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:37 IST2026-03-07T19:37:00+5:302026-03-07T19:37:24+5:30

प्राध्यापकास अटक, विनयभंगाचा गुन्हा दाखल

A professor molested a female student in a college in Kolhapur | वारंवार फोन अन् मेसेज, केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन; कोल्हापुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

वारंवार फोन अन् मेसेज, केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन; कोल्हापुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

​गोकुळ शिरगाव: कोल्हापुरातील एका महाविद्यालयातप्राध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संताजनक घटना घडली. पीडित विद्यार्थिनीला वारंवार फोन अन् मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत गैरवर्तन केले. प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. ​याप्रकरणी प्राध्यापक सौरभ जोशी (रा. स्मृती अपार्टमेंट, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शिक्षणासाठी कोल्हापुरात वास्तव्यास आहे. आरोपी सौरभ जोशी याने नोव्हेंबर २०२५ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्याने विद्यार्थिनीला वारंवार फोन आणि मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. केबिनमध्ये विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले.

धक्कादायक बाब म्हणजे जोशी याने यापूर्वीही मुलींशी गैरवर्तन केल्याची परिसरात चर्चा सुरु होती. तो वसतिगृहात राहणाऱ्या मुलींशी अनेकदा अपमानास्पद भाषेत बोलत असे. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने काल, गुरुवारी (दि.७) पोलिसांत धाव घेतली.

विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जोशीविरुद्ध विनयभंग, लैंगिक छळ आणि पाठलाग करणे यांसारखे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर, गोकुळ शिरगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगवान केला आहे. ​आरोपी सौरभ जोशी याने विद्यार्थिनीला केलेले मेसेजेस आणि कॉल रेकॉर्ड्स तांत्रिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. 

प्राध्यापक जोशी निलंबित 

​या घटनेनंतर महाविद्यालयाने विश्वस्त मंडळाची बैठक घेऊन प्राध्यापक जोशी यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तर, विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता जोशी विरोधात तक्रार द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले आहे.

Web Title : कोल्हापुर कॉलेज में छात्रा से छेड़छाड़ के आरोप में प्रोफेसर गिरफ्तार।

Web Summary : कोल्हापुर में एक प्रोफेसर को एक छात्रा को बार-बार फोन और मैसेज करके यौन उत्पीड़न करने के आरोप में गिरफ्तार किया गया। प्रोफेसर ने उसे अपने कार्यालय में बुलाकर दुर्व्यवहार किया। कॉलेज ने प्रोफेसर को निलंबित कर दिया, छात्रों से किसी भी कदाचार की रिपोर्ट करने का आग्रह किया।

Web Title : Professor arrested for molesting student in Kolhapur college.

Web Summary : A professor in Kolhapur was arrested for sexually harassing a student by repeatedly calling and messaging her, then abusing her in his office. The college suspended the professor, urging students to report any misconduct.