शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:17 IST

कसाही तोडलेला ऊस चालणार

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : गाळपासाठी येणारा ऊस कारखान्यात येण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे नवे तंत्र शोधण्यात आले आहे. ब्राझीलमधील हे नवे तंत्र भारतातही येऊ घातले आहे. ज्यामुळे साखरेचा उतारा वाढण्याबरोबरच महागड्या यंत्रसामग्रीची झीज कमी होऊन कारखान्यांची कार्यक्षमता सुधारणार आहे. भारताची उत्पादनक्षमता वाढण्यासही या तंत्राचा हातभार लागणार आहे.शेतातून तोड होऊन गाळपासाठी जो ऊस येतो त्यासोबत धसकट, कचरा, माती, वाळू, दगडाचे खडे, उसाची मुळे, पाचट हेदेखील येतात. ते गाळपापूर्वी वेगळे करण्याची सोय नसल्याने ऊस तसाच गाळपाला जातो. यामुळे कारखान्यातील महागड्या यंत्रसामग्रीचे नुकसान होते, गाळप क्षमतेवर तसेच साखर उताऱ्यावरही प्रतिकूल परिणाम होतो. याबद्दल महाराष्ट्रातील कारखाने मोळीबांधणी वजावट म्हणून प्रति टन ५ टक्के वजन कमी धरतात. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो.ब्राझीलमध्ये ही धसकटे तसेच नको असलेले इतर पदार्थ कारखान्यात ऊस गाळपाला जाण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे तंत्र चार-पाच वर्षांपूर्वी विकसित करण्यात आले आहे. परिणामी, ब्राझीलचा सरासरी साखर उतारा १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

भारतीय साखर उद्योगाला या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी येत्या १२ ऑगस्ट रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या तंत्राचे यावेळी सादरीकरणही केले जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कसाही तोडलेला ऊस चालणारमजुराने, यंत्राने अशा कोणत्याही प्रकारे तोडलेला ऊस या तंत्रज्ञानाने स्वच्छ करता येतो, भारतातील साखर कारखान्यांना कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकेल, असे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने