शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर झाला अपघात

By उद्धव गोडसे | Updated: June 5, 2023 15:55 IST

आंबा घाटात पोलिसांनी संशयित वाहन चालकाला पकडले

कोल्हापूर : बैल आणण्यासाठी गेल्यानंतर रस्ता ओलांडताना वाहनाने दिलेल्या धडकेत शेतक-याचा मृत्यू झाला. ह अपघात सोमवारी (दि. ५) सकाळी साडेनऊच्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर निळे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर घडला. विष्णू नारायण इंगवले (वय ५०, रा. कोतोली पैकी इंगवलेवाडी, ता. शाहूवाडी) असे मृताचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू इंगवले यांनी चांदोली येथील एका शेतक-याचा बैल खरेदी केला होता. बैल आणण्यासाठी ते सोमवारी सकाळी चांदोलीकडे निघाले होते. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर निळे येथे एका हॉटेलमध्ये थांबून त्यांनी मित्रांसोबत चहा घेतला. त्यानंतर लघुशंकेला जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी रत्नागिरीच्या दिशेने जाणा-या भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत इंगवले काही अंतर उडून जमिनीवर कोसळले.परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना खासगी वाहनातून मलकापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शाहूवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.वाहन पकडलेअपघातानंतर चालक ओमनी कार घेऊन रत्नागिरीच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर स्थानिक तरुणांनी रत्नागिरी पोलिसांना अपघाताची माहिती देऊन संशयित वाहन पकडण्याची विनंती केली. तसेच काही तरुणांनी दुचाकींवरून कारचा पाठलाग केला. आंबा घाटात पोलिसांनी संशयित वाहन चालकाला पकडल्याची माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातFarmerशेतकरीDeathमृत्यू