Kolhapur: राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी राजू शेट्टींसह अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:00 PM2023-11-24T14:00:30+5:302023-11-24T14:02:47+5:30

सतीश पाटील  शिरोली : जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना बेकायदेशीपणे जमाव एकत्रित करून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ९ तास ...

A case has been registered against 2500 activists including Raju Shetty in connection with blocking the Pune Bangalore National Highway | Kolhapur: राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी राजू शेट्टींसह अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Kolhapur: राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी राजू शेट्टींसह अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सतीश पाटील 

शिरोली : जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना बेकायदेशीपणे जमाव एकत्रित करून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ९ तास  रोखल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींसह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे अंमलदार निलेश कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

मागील हंगामातील ऊसाला १०० रुपये व चालू हंगामात तुटणाऱ्या ऊसाला ३५०० रुपये दर द्यावा. याबाबत माजी खासदार शेट्टी यांनी सुमारे दीड महिना कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन केले होते. दराचा योग्य तोडगा निघाला नसल्यामुळे राजू शेट्टी यांनी काल, गुरुवारी शेतकरी व कार्यकर्त्यांचा मोठा जमाव गोळा करून सभा घेत मिरवणूक काढत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते. हे आंदोलन सुमारे नऊ तास सुरू होते. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता.

याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील, अरुण माळी, राहूल पाटील, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, अशोक ऐतवडे, शरद पाटील, बंडू पाटील, सागर मादनाईक, अजित पोवार, शाहरुख पेंढारी, अनिल चव्हाण यांचेसह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against 2500 activists including Raju Shetty in connection with blocking the Pune Bangalore National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.