शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: दहावीतील विद्यार्थ्यांने शेजाऱ्याचे अठरा तोळे दागिने चोरले, चोरीच्या पैशातून मित्रांना दिली पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:57 IST

घरात किल्ली ठेवल्याचा घेतला गैरफायदा, आठवड्यात २० हजार उडवले, अल्पवयीन ताब्यात

कोल्हापूर : दहावीत शिकणाऱ्या मुलाने शेजारच्या घरातून साडेअठरा तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरून मौजमजा केल्याचा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील साडेअठरा तोळे सोने आणि २९ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत केली. याबाबत शुभांगी सुजय म्हात्रे (वय ५०, रा. पद्माराजे गल्ली, सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) यांनी १ जून रोजी फिर्याद दिली होती.सोन्या मारुती चौकातील शुभांगी म्हात्रे यांचे शहरात कॉफी शॉप असून, पती इचलकरंजी येथे एलआयसी कार्यालयात नोकरी करतात. २५ मे रोजी हे दाम्पत्य जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर १ जून रोजी बेडरूममधील कपाटातील साडेअठरा तोळे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तातडीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास करताना अंमलदार तानाजी दावणे यांना फिर्यादी म्हात्रे यांच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलावर संशय आला.घरात किल्ली ठेवल्याचा घेतला गैरफायदास्वच्छतेसाठी मोलकरीण येणार असल्याने म्हात्रे कुटुंबीय २५ मे रोजी शेजारच्या कुटुंबाकडे घराची किल्ली देऊन जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्याच दिवशी अल्पवयीन मुलाने मोलकरीण येण्यापूर्वी म्हात्रे यांच्या घराचे कुलूप काढून चोरी केली. चोरीनंतर पहिला संशय मोलकरणीवर आल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली होती.मित्रांना मॉलमध्ये दिली पार्टीचोरीनंतर मुलाने दागिने आणि रोकड स्वत:च्या घरावरील टेरेसवर लपवली होती. चोरीच्या पैशातून त्याने मित्रांना शहरातील एका नामांकित मॉलमध्ये पिझ्झा, बर्गरची पार्टी दिली. त्यानंतर स्वत:साठी स्पोर्ट्स शूज, फुटबॉलचे दोन किट आणि कपड्यांची खरेदी केली. आठवड्यात त्याने २० हजार ५०० रुपये उडवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस