शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९६५ विकास संस्था तोट्यात

By admin | Updated: October 8, 2015 00:42 IST

४८ कोटींचा तोटा : पीक कर्जातील घटत्या नफ्याचा परिणाम; जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी

राजाराम लोंढे - कोल्हापूर--पीक कर्जाचा कमी झालेला नफा, साखर कारखान्यांकडून वसुली न झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ९६५ विकास सेवा संस्था आतबट्ट्यात आल्या आहेत. या संस्थांना संपलेल्या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा तोटा झाला आहे. परिणामी सभासदांना लाभांश देता येत नाहीच, पण जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्याच्या अर्थकारणाचे प्रमुख केंद्र म्हणून विकास सेवा संस्थांकडे पाहिले जाते. अलीकडील चार-पाच वर्षांत आर्थिक केंद्रे अडचणीत आली आहेत. पीक कर्जाचे वाटप करणे हा मुख्य उद्देश विकास संस्थांचा आहे, पण शासनाच्या धोरणांमुळे पीक कर्जातील नफा एकदम कमी झाला आहे. पीक कर्जामध्ये केवळ २ टक्के मार्जिन घेण्याचे आदेश शासनाचे आहेत. परिणामी संस्थांचे उत्पन्न व खर्च यामध्ये ताळमेळ बसत नाही. त्यात जिल्हा बँकेने २००९-१० पासून लाभांश दिला नसल्याने संस्था अधिक अडचणीत आल्या आहेत. जिल्ह्यातील १८३७ विकास संस्थांचे सुमारे १२५ कोटींचे शेअर्स भांडवल जिल्हा बँकेकडे आहे. त्यावर गेल्या पाच-सहा वर्षांत एक रुपयाही लाभांश मिळालेला नाही. सरासरी लाभांश १० टक्क्यांप्रमाणे प्रत्येक विकास संस्थेला एक ते दीड लाख रुपये मिळू शकते. तेही उत्पन्न बंद झाल्याने संस्थांचा ‘अंगापेक्षा बोंगा’च मोठा झाला आहे. साखर कारखान्यांच्या उलाढालीवरच विकास संस्थांचा ताळेबंद अवलंबून असतो. मात्र यंदा जानेवारीमध्ये तुटलेल्या उसाचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी त्यांची कर्ज खाती थकल्याने विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. खर्चावर अंकुश हाच उपायशासनाचे धोरण, दिवसेंदिवस अडचणीत येणाऱ्या साखर कारखानदारीमुळे विकास संस्था चालविणे अवघड बनणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वारेमाप खर्च करून संस्था टिकणार नाही. नोकर पगारासह व्यवस्थापन खर्चावर अंकुश राखणे हाच उपाय आहे. सक्षमीकरण योजनेचे पैसे कधी?अडचणीत सापडलेल्या विकास संस्थांना बाहेर काढण्यासाठी आघाडी सरकारने विकास संस्था सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून एकूण पीक कर्जाच्या १ टक्के पैसे देण्याचे मान्य केले आहे. त्यातून वर्षाला लहान संस्थेला कमीत कमी एक लाख रुपये मिळणार आहेत. त्यातील ५० कोटी रुपये राज्यासाठी मंजूर झाले आहेत, त्याचे वाटप झालेले नाही. विकास संस्थांचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. यासाठी सरकारने पीक कर्जामधील मार्जिन १ टक्क्याने वाढवून दिले व जिल्हा बँकेने लाभांश दिला तर बऱ्यापैकी अडचणी कमी होऊ शकतात.- संभाजीराव चाबूक (जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना) तोट्यात जाण्याची कारणेपीक कर्जाचे कमी झालेले मार्जिनजिल्हा बॅँकेकडून लाभांश नाहीउत्पन्नाचे स्रोत कमीसचिव वर्गणी व कर्मचारी पगारावरील खर्चतोट्यातील संस्थांचा परिणाम-सभासदांना लाभांश मिळणार नाहीस्वभांडवल धोक्यात येणारजिल्हा बॅँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणीदृष्टिक्षेपात विकास संस्था- एकूण संस्था : १८३७ नफ्यातील : ८७२ (१८ कोटी ८१ लाख नफा) तोट्यातील : ९६५ (४८ कोटी ३ लाख तोटा)असा आहे ताळेबंद उत्पन्न : कर्ज वाटप, २ ते ४ टक्के व्याजदर, इमारत भाडेखर्च : सचिव पगार वर्गणी, बोनस, मानधन, संस्था कर्मचारी पगार, बोनस, संचालक भत्ते, सभा-समारंभ, आॅडिट फीसह शासकीय खर्च