शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ९० द.ल.लि. सांडपाण्यावर प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने शहरातील निर्माण होणाऱ्या ९६ द.ल.लि. पैकी ९०.९६ द.ल.लि. सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा ...

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने शहरातील निर्माण होणाऱ्या ९६ द.ल.लि. पैकी ९०.९६ द.ल.लि. सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. हरित लवाद व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार जयंती नाला येथे ब्लिचिंग पावडरचा डोस देण्यात येत असून, पारंपरिक पद्धतीने आळू व कर्दळ यांची लागवड देखील करण्यात आली असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीचे प्रदूषण केल्याप्रकरणी महानगरपालिकेला नोटीस बजावली होती, त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात हा दावा केला आहे.

शहराला पुईखडी, बालिंगा, कळंबा व बावडा येथील जलशुद्धिकरण केंद्रामार्फत रोज १२० द.ल.लि. पाण्याचा उपसा केला जात असून त्यापैकी वितरण केलेल्या पाण्यापासुन सुमारे ९६ द.ल.लि. सांडपाण्याची रोज निर्मिती होते. यापैकी ९० द.ल.लि. सांडपाण्यावर महापालिकेच्यावतीने प्रक्रिया केली जाते.

शहरालगतच्या कळंबा, पाचगाव, आर.के. नगरचा काही भाग आणि मोरेवाडी गावातील सांडपाणी रोज जयंती नाल्यात मिसळत असल्याने सांडपाण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा ताण महापालिकेच्या यंत्रणेवर पडत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

पंपिंग स्टेशनची कार्यक्षमता -

जयंती नाला - सहा पंप असून, त्यापैकी ४५० अश्वशक्तीचे दोन पंप कायमस्वरूपी कार्यरत. चार पंपांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू.

लाईन बाझार नाला- १३० अश्वशक्तीचे सबमर्सिबल पंपचे दोन सेट नोव्हेंबर २०१९ पासून कार्यरत. तेथून पाच द.ल.लि. पाणी उपसा होतो.

बापट कॅम्प नाला - १२० अश्वशक्तीचे सबमर्सिबल पंपचे तीन सेट व ८० अश्वशक्तीचे दोन पंप डिसेंबर २०१९ पासून कार्यरत. तेथून दहा द.ल.लि. पाणी उपसा होतो.

दुधाळी नाला - १७ द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र. जुलै २०१८ पासून कार्यान्वित.

अमृत दोन पंपिंग स्टेशनची कामे सुरू -

दुधाळी येथे सहा द.ल.लि. व लाईन बाझार येथे चार द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच पाच नाले अडविणे व वळविण्याचे काम हाती घेतले असुन, प्रगतिपथावर आहे.