शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८१ कारखान्यांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 12, 2014 00:53 IST

हंगामास वेग : पुणे विभागात सर्वाधिक कारखाने सुरू

कोल्हापूर : पहिल्या उचलीचा तिढा अजून सुटलेला नाहीच परंतु त्यासाठी यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनीही आंदोलनाची ‘तलवार म्यान’ केल्याने राज्यातील ८१ म्हणजे निम्म्याहून जास्त कारखाने सुरू झाले आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने १० नोव्हेंबरपर्यंत हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांची माहिती दिली असून त्यावरून हे स्पष्ट होत आहे. ऊस आंदोलन चळवळीच्या गेल्या एका तपाच्या संघर्षात यंदा पहिल्यांदाच असे घडले आहे की, पहिल्या उचलीबाबत काहीच ठोस हाती नसताना हंगाम मात्र जोराने सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्णांतील शाहू (कागल) कारखान्याने २५३० रुपये तर शिरोळ तालुक्यातील ‘गुरुदत्त शुगर्स’ने २५३५ रुपये अशी एफआरपी एवढी एकरकमी पहिली उचल जाहीर केली आहे. अन्यथा राज्यभरातील एखादा अपवादवगळता एकाही कारखान्याने उचल किती देणार हे न सांगताच गाळप सुरू केले आहे व शेतकरीही त्यांना ऊस घालत आहेत. राज्यात यंदा सुमारे १६० कारखाने सुरू होतील, असा शासनाचाच प्राथमिक अंदाज आहे. त्यातील ८१ कारखाने आतापर्यंत सुरू झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३७ कारखाने खासगी आहेत. या कारखान्यांनी २६ लाख १९ हजार टन गाळप करून २१ लाख ४२ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. परतीचा पाऊस व जमिनीत अजूनही पावसाचा ओलावा असल्याने उतारा अगदीच कमी आहे. प्रतिवर्षी तो हंगामाच्या सुरुवातीला कमीच असतो. सर्वाधिक ४० कारखाने पुणे विभागात त्यातही पुणे व सोलापूर जिल्ह्णांत सुरू झाले आहेत. अमरावती व नागपूर विभागात मात्र अजून एकही कारखाना सुरू झालेला नाही. तिथे हंगाम घेणाऱ्या कारखान्यांची संख्याही अगदीच कमी असते.केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. भाजप प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होती. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांना सरकार विरोधात लगेच लढ्याचे अस्त्र उगारण्यास मर्यादा आल्याने त्यांनी सरकारला २५ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. ऊसदर निश्चित करणारे मंडळ कालच अस्तित्वात आले आहे. त्याची पहिली बैठक १५ नोव्हेंबरला होणार असली तरी त्यातून लगेच काही दर निश्चित होण्याची शक्यता नाही. शिवाय सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने ठोस मदत केल्याशिवाय यंदा एफआरपीही एकरकमी देणे शक्य नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. आंदोलनामुळे गेल्यावर्षी हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाला होता. यंदा संघर्ष नसल्यामुळे तो किमान महिनाभर अगोदर सुरु झाला आहे. त्यामुळे अन्य काही तोटा झाला तरी लवकर गाळप होऊन शेतकऱ्यांना चांगले टनेज मिळेलच शिवाय जमीन लवकर रिकामी होणार असल्याने रब्बीचे पीकही पदरी पडेल अशी स्थिती आहे.दृष्टिक्षेपात यंदाचा हंगामविभागसुरू झालेले कारखानेऊस गाळपसाखर उत्पादनउतारा (कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल)(टक्के)कोल्हापूर८ (२)००.९४००.४०४.२८पुणे२१ (१९)१८.०७१५.९९८.८५नगर१०(३)३.३७२.६४७.८२औरंगाबाद२(७)१.४५०.८२५.६४नांदेड३ (६)२.३६१.५७६.६८एकूण४४(३७)२६.१९२१.४२८.१८गत हंगामावर दृष्टिक्षेप२०१४२०१३कारखाने सुरू१५७ १७० (६२) (६१ खासगी)ऊस गाळप लाख टन६७६.२६७००.२६ साखर लाख टन७७.००८०.०० सरासरी साखर उतारा११.४०११.४०संभाव्य गाळप २०१५कारखाने सुरू १६०गाळप टन ७८५साखर ८८ लाख टन