शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

कोल्हापुरातील रंकाळ्यात ८० वर्षांचे कासव मृत, मृत्यूच्या कारणावरुन चर्चेला ऊत

By संदीप आडनाईक | Updated: July 8, 2025 13:09 IST

पर्यावरणतज्ज्ञांकडून अनेक कारणे

संदीप आडनाईककोल्हापूर : रंकाळ्यात वास्तव्य असलेल्या इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल या मऊ पाठीच्या वृद्ध कासवाचा बळी गेला. त्याचे वय ८० वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचा अंदाज आहे. वृद्धावस्था, टिलापिया वनस्पती, प्रदूषित पाण्यामुळे तसेच मासेमारीच्या जाळीत अडकून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता अभ्यासक आणि पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली असली तरी वनविभागाने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले आहे.रंकाळा तलावात राजघाट समोर रविवारी रात्री दोन तरुणांना हे कासव तरंगताना दिसले. याला शास्त्रीय भाषेत Nilssonia gangetica असे म्हणतात. आययूसीएनच्या संकटग्रस्त यादीत याचा समावेश आहे. या कासवाला रंकाळा बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढले. या कासवाची लांबी तीन फूट आहे. त्याच्या तोंडाच्या भागाला तसेच अन्यत्र जखमा होत्या. काही अभ्यासकांच्या मते दोन ते तीन दिवसांपासून मासेमारीचा गळ तोंडाच्या भागात अडकल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असावा. मासेमारीच्या जाळीपासून सुटका करण्याच्या प्रयत्नात तो काठाजवळ आला. दरम्यान, वनविभागाने पोस्टमार्टम केले. त्यात याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे वनविभागाने सांगितले. किमान सहा दिवस आधी याचा मृत्यू झाला होता. कुजल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात आले. मुडशिंगी येथील वनविभागाच्या नर्सरीत या कासवाला दफन करण्यात आले आहे.

रंकाळा तलाव मासे, कासव यांच्यासारख्या प्राण्यांसाठी आश्रयस्थान आहे ; पण गेल्या काही वर्षांत या तलावातील प्रदूषण वाढल्यामुळे या जलचरांचा मृत्यू होत आहे. अनेक कासवांचा यातील प्रदूषित पाण्यामुळेच मृत्यू झाला आहे. -संतपाल गंगनमाले, संशोधक, ठाकरे वाईल्ड लाइफ फाउंडेशन. 

रंकाळ्याच्या प्रदूषित पाण्यात वाढणाऱ्या टिलापिया ही आक्रमक, जलद प्रजनन करणारी वनस्पती अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे कासवांना धोका असतो. टिलापियामध्ये कमी पोषणतत्त्वे आणि जास्त यूरिक आम्ल असते, त्यामुळे स्थानिक उभयचरांना संधिवात आणि सांधेदुखी होऊ शकते. यामुळे त्यांच्या हालचालींमध्ये अडचण येते, पोहता येत नाही. पृष्ठभागावर येऊन ते श्वास घेऊ शकत नाहीत. - यशोधन धनाजी जाधव, कासव अभ्यासक.