तौक्ते वादळाने चंदगड तालुक्यातील ८ शाळांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:25 AM2021-05-19T04:25:50+5:302021-05-19T04:25:50+5:30

कोकरे, शाळा इमारतीवर झाड कोसळून इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. कुरणी शाळेनजीकचे झाड शाळा कंपाऊंड, पाण्याची टाकी व प्रवेशद्वारावर ...

8 schools in Chandgad taluka damaged by storm | तौक्ते वादळाने चंदगड तालुक्यातील ८ शाळांचे लाखोंचे नुकसान

तौक्ते वादळाने चंदगड तालुक्यातील ८ शाळांचे लाखोंचे नुकसान

googlenewsNext

कोकरे, शाळा इमारतीवर झाड कोसळून इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. कुरणी शाळेनजीकचे झाड शाळा कंपाऊंड, पाण्याची टाकी व प्रवेशद्वारावर कोसळल्याने, वाघोत्रे शाळेच्या स्वच्छता गृहावर झाडाची फांदी मोडून पडल्याने, इसापूर, फाटकवाडी, मांडेदुर्ग शाळांचे छप्पर वादळाने उडाल्यामुळे, कानूर येथील भावेश्वरी संदेश विद्यालय व खन्नेटी शाळेचे झाड पडून नुकसान झाले आहे. शाळांना सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरे, कुरणी जि. प. शाळांना तत्काळ भेटी देऊन जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, सभापती अ‍ॅड. अनंत कांबळे, अभियंता विजय सदावरे, गटशिक्षणाधिकारी एस. एस. सुभेदार, केंद्रप्रमुख जी. बी. जगताप आदींनी नुकसानीची पाहणी केली.

नुकसान झालेल्या शाळांनी नुकसानीचे पंचनामे करून दुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत, अशा सूचना जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांनी केल्या.

तालुक्यातील शाळांच्या आवारात जीर्ण, धोकादायक व वाळवी लागून कमकुवत झालेली झाडे असतील तर ती काढावीत. याबाबतचे लेखी परिपत्रक शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व शाळांना पाठवावे, अशी सूचना केली आहे

-------------------------

फोटो ओळी : कोकरे (ता. चंदगड) येथील वादळी वाऱ्याने प्राथमिक शाळेच्या इमारतीवर वृक्ष कोसळून इमारतीचे नुकसान झाले.

क्रमांक : १८०५२०२१-गड-०९

Web Title: 8 schools in Chandgad taluka damaged by storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.