शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के मतदानं!

By admin | Updated: October 16, 2014 00:49 IST

विधानसभा निवडणूक : सांगलीत ७०, सिंधुदुर्गात ६८, तर रत्नागिरीत ६२ टक्के मतदान

कोल्हापूर : कमालीची चुरस, पराकोटीच्या ईर्ष्येने कार्यकर्त्यांची सुरू असलेली घालमेल, त्यातून निर्माण होणारा तणाव, अशा वातावरणात आज, बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात ७०.३३ टक्के मतदान झाले. सर्वच मतदारसंघात दुपारपर्यंत रांगा लागल्या. आॅक्टोबर हिटचा तडाखा असह्य असूनही जिथे चुरस अधिक आहे, तिथे मताचा टक्का वाढला. सरासरी ७५ टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. जिल्ह्यात दहा मतदारसंघांत १२१ उमेदवार रिंगणात आहेत. माजी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह मातब्बरांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले.सांगली : तुल्यबळ उमेदवार व बहुरंगी लढतींमुळे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत आज चुरशीने ७०. ८४ टक्के मतदान झाले. पलूस-कडेगाव व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसली. १०७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले आहे. सहा माजी मंत्र्यांसह दिग्गज उमेदवार मैदानात असल्यामुळे जिल्ह्यातील लढती लक्ष्यवेधी ठरल्या. सर्वच मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी, पंचरंगी व बहुरंगी लढती असल्यामुळे मतदानही तितक्याच चुरशीने झाले. सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात सुमारे ६८ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात मतदानाच्या सुरुवातीलाच मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने सात मतदान यंत्रे बदलली. याव्यतिरिक्त कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत. परजिल्ह्यातील सुमारे बाराजणांना आतापर्यंत ताब्यात घेतले असून, अशा लोकांना शोधण्याची मोहीम तीव्र करणार असल्याचे सांगतानाच सावंतवाडी मोटारसायकल जळीत प्रकरणातील चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बाळा राणे यांचे अपहरण झाले नव्हते, तर ते नातलगांकडे गेले होते. ते सापडल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५३.८३ टक्के मतदान झाले आहे. पुढच्या एका तासातील मतदानाचा विचार करता सुमारे ६० ते ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सर्वाधिक मतदान चिपळुणात, तर रत्नागिरीत सर्वांत कमी मतदान झाले.विशेष...कोल्हापुरात मारहाणसांगलीत दोन ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी रत्नागिरीतील एका मतदान केंद्रावर वाजले सनईचे सूरसिंधुदुर्गात सात मतदान यंत्रांत बिघाडसिंधुदुर्गात परजिल्ह्यातील बाराजणांना घेतले ताब्यात