शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांकडून ६३ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : गेल्या तेरा दिवसांत संचारबंदी कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ हजार ४५९ वाहनधारकांवर कारवाई केली. पोलीस प्रशासनाने या ...

कोल्हापूर : गेल्या तेरा दिवसांत संचारबंदी कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ हजार ४५९ वाहनधारकांवर कारवाई केली. पोलीस प्रशासनाने या वाहनधारकांकडून एकूण ६३ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करून तो शासनाच्या तिजोरीत जमा केला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. १४ एप्रिलपासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाने संचारबंदी पुकारली. यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर काही वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. गेल्या तेरा दिवसांत पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे २६१८ दुचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई केली. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर ही जप्त केलेली वाहने कागदपत्रांची छाननी करून नियमानुसार दंड भरून मालकांना परत देण्यात येणार आहेत.

दि. १४ ते २६ एप्रिल या संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ हजार ४५९ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६३ लाख ३५ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. ही दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली.

विनामास्कप्रकरणी २३ लाख ६१ हजार दंड

पोलीस प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकाने शहरात संचारबंदी कालावधीत विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाईचे शस्त्र उगारले. गेल्या तेरा दिवसांतं १० हजार ९९४ नागरिकांवर विनामास्कची कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे २३ लाख ६१ हजार २०० रुपये दंड वसूल केला. ही दंडाची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली.