शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कोमनपास ६ कोटी ४३ लाखाचे अनुदान

By admin | Updated: August 23, 2015 17:54 IST

नगरविकास विभागाची मान्यता : ‘एलबीटी’मुळे उत्पन्नातील घट भरुन काढण्यासाठी दिलासा

कोल्हापूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केल्यामुळे उत्पन्नात येणारी घट भरून काढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेस ६ कोटी ४३ लाख सहायक अनुदान देण्यास २० आॅगस्टला शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या महानगरपालिकेस दिलासा मिळणार आहे. राज्यातील २५ महानगरपालिकांना ४१९,६९,००,००० रुपये वितरीत करण्यात येणार आहेत. एलबीटी महानगरपालिकेचे (मनपा)उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. एलबीटीवरच कर्मचाऱ्यांचा पगार व विकासकामे केली जात होती. दरम्यान, १ आॅगस्टपासून ५० कोटींपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्या सर्व व्यापाऱ्यांंची एलबीटीतून मुक्तता करण्यात आली. त्यामुळे महानगरपालिकेचे उत्पन्न घटले. मनपास कर्मचाऱ्यांचे पगार भागविण्यासाठी पैसे नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. याप्रमाणे राज्यातील सर्वच मनपांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली. एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापासून प्राप्त होणारे उत्पन्न व ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडील एलबीटी मनापचे उत्पन्नाचे स्रोत झाले आहेत. त्यातून मिळणारे उत्पन्न व सन २०१५- १६ वर्षात करापासून मिळणारे संभाव्य उत्पन्न यामध्ये येणारी तूट शासन अनुदानाच्या स्वरूपात दिली जात आहे. मनपाना दैनंदिन खर्च भागविण्यासाठी सप्टेंबर २०१५ साठी अनुदानाचा दुसरा हप्ता देण्यास नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे.