‘कॉस्ट अकौंटन्टस’च्या परीक्षेत ५५ जणांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST2021-04-10T04:25:07+5:302021-04-10T04:25:07+5:30

कोल्हापूर : द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटन्टस्‌ ऑफ इंडिया (कोलकाता) यांच्यामार्फत डिसेंबरमध्ये फौंडेशन, इंटरमिडियेट, अंतिम विभागामध्ये परीक्षा झाली. ...

55 pass the Cost Accountants exam | ‘कॉस्ट अकौंटन्टस’च्या परीक्षेत ५५ जणांचे यश

‘कॉस्ट अकौंटन्टस’च्या परीक्षेत ५५ जणांचे यश

कोल्हापूर : द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटन्टस्‌ ऑफ इंडिया (कोलकाता) यांच्यामार्फत डिसेंबरमध्ये फौंडेशन, इंटरमिडियेट, अंतिम विभागामध्ये परीक्षा झाली. त्यामध्ये या इन्स्टिट्यूटच्या कोल्हापूर, सांगली चॅप्टरच्या एकूण ५५ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या परीक्षांचा निकाल दि. २९ मार्च रोजी ऑनलाईन जाहीर झाला.

अंतिम परीक्षेत सागर चाळके, रूपेश काळे, नारायणकुमार मलदे यांनी यश मिळविले. इंटरमिडियेट परीक्षेत ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ऐश्वर्या दायमा, गोपिका कारवा, हिमांशु जवळकर, श्रेया जनगोंडा, सोनल गोवेकर, ऐश्वर्या माने, हर्षदा सबळे, राहुल वैराट, शुभम तवळ, सौरभ सुकवे, अक्षय महादादुलकर, हेमा केटकाळे, रोहित पाटील, सिध्दार्थ मोरे, सुनील पाटील आदींचा समावेश आहे. फौंडेशन परीक्षेत १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली चॅप्टरच्या ३९ विद्यार्थ्यांनी अंतिम, १५२ जणांनी इंटरमिडियेट आणि ३४ विद्यार्थ्यांनी फौंडेशन परीक्षा दिली होती.

Web Title: 55 pass the Cost Accountants exam