कोल्हापुरातून ५०० कार्यकर्ते बुलडाण्याकडे रवाना; शिवाजी कोण होता? चे करणार वाचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:10 IST2026-04-28T13:08:29+5:302026-04-28T13:10:20+5:30

छत्रपती शिवाजी महाराज की जय, आम्ही सारे गोविंद पानसरे अशा घोषणा देत कोल्हापुरातील ५०० हून अधिक कार्यकर्ते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बुलडाण्याकडे रवाना झाले.

500 activists from Kolhapur leave for Buldana; Will read Who was Shivaji? book | कोल्हापुरातून ५०० कार्यकर्ते बुलडाण्याकडे रवाना; शिवाजी कोण होता? चे करणार वाचन

कोल्हापुरातून ५०० कार्यकर्ते बुलडाण्याकडे रवाना; शिवाजी कोण होता? चे करणार वाचन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज की जय, आम्ही सारे गोविंद पानसरे अशा घोषणा देत कोल्हापुरातील ५०० हून अधिक कार्यकर्ते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बुलडाण्याकडे रवाना झाले. आज मंगळवारी सकाळी हे कार्यकर्ते बुलडाण्यात पोहचणार असून तेथे ते आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे जाहीर वाचन करणार आहेत.

प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरुन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यांचा जाव विचारण्यासाठी मंगळवारी (दि.२८) बुलडाण्यातील त्यांच्या घरावर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते महामोर्चा काढणार आहेत. यासाठी कोल्हापुरातून भाकप व इतर पक्षांचे सुमारे ५०० हून अधिक कार्यकर्ते बुलडाण्यास रवाना झाले. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी चौक येथून शिवरायांना अभिवादन करून शेकडो कार्यकर्ते बुलडाण्यास रवाना झाले.

यावेळी स्मिता पानसरे म्हणाल्या, प्रशांत आंबी यांना धमकी देणाऱ्या आमदार गायकवाड यांना पोलीस राजकीय दबावापोटी अटक करीत नाहीत. उलट मरणोत्तर पानसरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ही मागणी चोराच्या उलट्या बोंबा अशा प्रकारची आहे. संजय गायकवाड यांचा खुनाशी काही संबंध होता का? याचा तपास पोलिसांनी करावा. गिरीश फोंडे म्हणाले, शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करण्याऐवजी गायकवाड यांचा केला जात आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

प्रशांत आंवी म्हणाले, गायकवाड यांना जाब विचारण्यासाठी बुलडाण्यास कार्यकर्ते जात आहोत. विरोध असणाऱ्या पुस्तकांचे वाचन करणार आहे. मरणोत्तर पुरस्कार दिला जातो, मात्र मरणोत्तर पानसरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अजब आहे. यावेळी आरती रेहेकर, दिलदार मुजावर, रघुनाव कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title : कोल्हापुर से बुलढाणा के लिए 500 कार्यकर्ता रवाना; करेंगे 'शिवाजी कौन थे?' का वाचन

Web Summary : कोल्हापुर के 500 से अधिक कार्यकर्ता बुलढाणा के लिए रवाना हुए। वे विधायक संजय गायकवाड़ के घर के सामने गोविंद पानसरे की पुस्तक 'शिवाजी कौन थे?' का पाठ करके प्रकाशक प्रशांत आंबी को दी गई धमकी का विरोध करेंगे।

Web Title : Kolhapur activists head to Buldhana to read 'Shivaji Kon Hota?'

Web Summary : Over 500 Kolhapur activists rallied to Buldhana, planning to protest by reading Govind Pansare's book 'Shivaji Kon Hota?' in front of MLA Sanjay Gaikwad's home, following threats to publisher Prashant Ambi.