शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी मद्यासह ३६ लाखांचा माल जप्त

By admin | Updated: June 1, 2015 00:12 IST

टेम्पो पकडला : राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाची कारवाई

कोल्हापूर : गोव्याहून पुण्याकडे प्लास्टिक पाईप घेऊन जाणाऱ्या टेम्पोतून विदेशी मद्याचे साडेपाचशे बॉक्स पुणे-बंगलोर महामार्गावरील सरनोबतवाडीजवळ राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने रविवारी सकाळी पकडले. याप्रकरणी टेम्पोचालक पाँचू हरिजन (वय २४) व किन्नर गौतम (३० दोघे रा. डेरामपूर, उत्तर प्रदेश) यांना पकडून विदेशी मद्यासह सुमारे ३६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला, तर संशयित जितेंद्र रिजवानी (रा. उल्हासनगर, ठाणे) याचा शोध सुरू आहे.याबाबत पथकाने सांगितले की, गोव्याहून पुण्याकडे रविवारी सकाळी सातारा पासिंगचा (एम.एच. ११ एएल २१५९) टेम्पो पुणे-बंगलोर महामार्गावरून निघाला होता. यावेळी भरारी पथकाने हा टेम्पो अडविला. त्यामध्ये प्लास्टिकच्या पाईप व त्यावर ताडपत्री झाकली होती. पथकाने संपूर्ण टेम्पोची तपासणी केली असता या प्लास्टिक पाईपखाली विदेशी मद्याचे बॉक्स आढळले. त्यानंतर टेम्पो रंकाळा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला. संशयित टेम्पोचालक पाचू हरिजन व केशरीलाल गौतम यांनी हे विदेशी मद्य गोव्यातून पुण्याला नेत असल्याचे पथकाला सांगितले. या टेम्पोच्या बॉक्समधील ७५० मिलिमीटरच्या नऊ हजार तर १८० मिलिलिटरच्या सात हजार २०० बाटल्या अशा एकूण १६ हजार २०० बाटल्या सुमारे २७ लाख २६ हजार ४०० रुपयांचा विदेशी मद्यासह टेम्पो असा ३६ लाख २५ हजार ३८० रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक बी. के. जाधव, दुय्यम निरीक्षक देवरे व महाराष्ट्र भरारी पथकाने केली.