सन्मती बँकेला 3 कोटी 13 लाख रुपये नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:10+5:302021-04-04T04:25:10+5:30

गेल्या आर्थिक वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे देशांतर्गत उघोग, व्यापार, सेवा यासह सर्व क्षेत्रात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ...

3 crore 13 lakh profit to Sanmati Bank | सन्मती बँकेला 3 कोटी 13 लाख रुपये नफा

सन्मती बँकेला 3 कोटी 13 लाख रुपये नफा

गेल्या आर्थिक वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे देशांतर्गत उघोग, व्यापार, सेवा यासह सर्व क्षेत्रात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे थकीत कर्ज वसुलीवरही विपरीत परिणाम झाला. मात्र, बँकच्या एनपीएमध्ये समाधानकारक वसुली झाली. बँकेने ७२१ कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, चालू आर्थिक वर्षात मागील आर्थिक वर्षापेक्षा अधिक चांगले काम केले आहे. बँकेत ३२५ कोटी रुपये ठेवी असून १९६ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. आरबीआयच्या नवीन पतधोरणानुसार कर्जदारांना रिस्ट्रक्चरचा लाभ देण्यात आला. त्या कर्ज खात्यावर नियामाप्रमाणे आवश्यक त्या तरतुदी केल्या आहेत. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत बँक नेट एनपीए २.०४ टक्के ठेवण्यात यशस्वी झाली असून, बँकेने नियोजनबद्ध केलेल्या वसुलीमुळे हे यश प्राप्त झाले आहे. वेळेवर कर्जाचे हप्ते करून कर्जदारांनीही बँकेला मोलाचे सहकार्य केले आहे. बँकेच्या उल्लेखनीय यशासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे बहुमूल्य योगदान लाभले.

Web Title: 3 crore 13 lakh profit to Sanmati Bank