२९ कोविड केअर केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:26 IST2021-08-23T04:26:04+5:302021-08-23T04:26:04+5:30

शिवाजी विद्यापीठ वसतिगृह क्रमांक एक, दोन, तीन, शेंडा पार्क, जैन बोर्डिंग, सायबर कॉलेज, महासैनिक प्रशिक्षण केंद्र, फुलेवाडी, दुधाळी पॅव्हेलियन ...

29 Kovid Care Centers closed | २९ कोविड केअर केंद्र बंद

२९ कोविड केअर केंद्र बंद

शिवाजी विद्यापीठ वसतिगृह क्रमांक एक, दोन, तीन, शेंडा पार्क, जैन बोर्डिंग, सायबर कॉलेज, महासैनिक प्रशिक्षण केंद्र, फुलेवाडी, दुधाळी पॅव्हेलियन हॉल, साने गुरुजी बॅडमिंटन हॉल, हॉकी स्टेडियम, विचारेमाळ येथील पंजाबराव देशमुख वसतिगृह, कसबा बावड्यातील अंडी उबवणी केंद्र आदी १४ कोविड केअर केंद्र बंद झाली आहेत. यामुळे बाधितांनी या केंद्रात उपचारासाठी जाऊ नये, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केलेे आहे.

...........

खर्चाची मोजदाद लवकरच

महापालिका आणि सरकारच्या आरोग्य केंद्राच्या मदतीने चालवलेल्या कोविड केअर केंद्रावर दुसऱ्या लाटेत किती शासनाचे नेमके पैसे किती खर्च झाले याची मोजदाद प्रशासनातर्फे केले जात आहे. दोन दिवसांत किती निधी खर्च झाला, हे समोर येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Web Title: 29 Kovid Care Centers closed