विक्रीसाठी आणलेला २८ किलो गांजा कोल्हापुरात जप्त, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 13:11 IST2024-10-11T13:10:27+5:302024-10-11T13:11:07+5:30

कोल्हापूर : धुळे आणि पंढरपुरातून कोल्हापुरात विक्रीसाठी आणलेला ५ लाख ६५ हजार रुपयांचा २८ किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण ...

28 kg ganja brought for sale seized in Kolhapur, two arrested | विक्रीसाठी आणलेला २८ किलो गांजा कोल्हापुरात जप्त, दोघांना अटक

विक्रीसाठी आणलेला २८ किलो गांजा कोल्हापुरात जप्त, दोघांना अटक

कोल्हापूर : धुळे आणि पंढरपुरातून कोल्हापुरात विक्रीसाठी आणलेला ५ लाख ६५ हजार रुपयांचा २८ किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त करून दोघांना अटक केली. निहाल इक्बाल शेख (वय २७, रा. शिरपूर, जि. धुळे) आणि चरण लालासाहेब शिंदे (३२, रा. माण, जि. सातारा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. राजाराम तलावाजवळ गुरुवारी (दि. १०) दुपारी सापळा रचून ही कारवाई केली.

राजाराम तलाव परिसरात दोन संशयित गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तीन पोत्यांमध्ये सुमारे २८ किलो गांजा मिळाला. त्यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कोल्हापूर, बेळगावात विक्री

अटकेतील दोन्ही संशयित सराईत आहेत. शेख याच्यावर शिरपूर पोलिस ठाण्यात एक, तर शिंदे याच्यावर म्हसवड पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. ते कोल्हापूर आणि बेळगावात गांजाची विक्री करणार होते. त्यांच्या ग्राहकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: 28 kg ganja brought for sale seized in Kolhapur, two arrested