राधानगरी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेला २५ लाखांचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST2021-08-27T04:28:23+5:302021-08-27T04:28:23+5:30

: राधानगरी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेला पंचवीस लाख ६९ हजार रुपये नफा झाला आहे. सभासदांना १३.५० टक्के लाभांश ...

25 lakh benefit to Radhanagari Panchayat Samiti Karmachari Patsanstha | राधानगरी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेला २५ लाखांचा फायदा

राधानगरी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेला २५ लाखांचा फायदा

: राधानगरी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेला पंचवीस लाख ६९ हजार रुपये नफा झाला आहे. सभासदांना १३.५० टक्के लाभांश व ठेवीवर १० टक्के टक्के व्याज देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष विजय मोरे यांनी दिली. संस्थेच्या ऑनलाईन झालेल्या २३ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते.

संस्थेने दीपावली भेट, सभासदांच्या पाल्यांचा व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार, मृत सभासद कर्जमुक्ती योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले.

संस्था चांगल्या प्रकारे चालली असून पुढील काळात कर्जावरील व्याजात कपात करावी, रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चांगली भेट द्यावी अशा सूचना सभासदांनी केल्या. संस्थापक बाबूराव शिरसाठ, विलास पाटील, आर एस पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक संतोष शिरोडकर यांनी अहवाल वाचन केले. संचालक पांडुरंग बर्गे, कुलदीप पाटील धनाजी पाटील, बी. डी. पवार, धनाजी महेकर, विलास नीचिते, महादेव व्हरकट, बळवंत चौगुले, पांडुरंग कुंभार, संभाजी खोत आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष साताप्पा पाटील यांनी आभार मानले.

Web Title: 25 lakh benefit to Radhanagari Panchayat Samiti Karmachari Patsanstha