Kolhapur: शाळेतून उशिरा घरी आली, आई क्लासला जाऊ नको म्हणाली; रागात वरच्या खोलीत गेली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:06 IST2026-01-20T19:04:37+5:302026-01-20T19:06:25+5:30

दहावीच्या वर्गात शिकत होती

16 year old student ends life in anger over being banned from attending class in kolhapur | Kolhapur: शाळेतून उशिरा घरी आली, आई क्लासला जाऊ नको म्हणाली; रागात वरच्या खोलीत गेली, अन्...

Kolhapur: शाळेतून उशिरा घरी आली, आई क्लासला जाऊ नको म्हणाली; रागात वरच्या खोलीत गेली, अन्...

गांधीनगर : आईने क्लासला जाण्यास मनाई केल्याच्या रागातून तनिष्का अमित गवळी (वय १६ रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तनिष्का गडमुडशिंगी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. ती शाळेतून उशिरा घरी आली होती. आईने उशिराचे कारण विचारले असता मैत्रिणीसोबत देवदर्शनासाठी गेल्याचे तिने सांगितले. आईने तिला क्लासला जाऊ नको, खूप वेळ झाला आहे, असे सांगितल्याने ती रागावली. 

तिने वरच्या खोलीत जाऊन आत्महत्या केली. आईने खोलीत जाऊन पाहिले असता तनिष्काने गळफास घेतल्याचे लक्षात आले. तिला सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद रात्री उशिरा गांधीनगर पोलिस ठाण्यात घेण्याचे काम सुरु होते.

Web Title : कोल्हापुर: देर से घर आने पर डांटे जाने पर किशोरी ने की आत्महत्या।

Web Summary : कोल्हापुर के गडमुडशिंगी में, 16 वर्षीय तनिष्का गवळी ने स्कूल से देर से लौटने के कारण माँ द्वारा क्लास जाने से मना करने पर फांसी लगाकर आत्महत्या कर ली। बहस हुई, जिसके परिणामस्वरूप विनाशकारी कृत्य हुआ। उसे अस्पताल में मृत घोषित कर दिया गया।

Web Title : Kolhapur: Teen girl commits suicide after being scolded for late return.

Web Summary : In Gadmudshingi, Kolhapur, a 16-year-old girl, Tanishka Gawli, tragically ended her life by hanging after her mother forbade her from attending class due to her late return from school. An argument ensued, leading to the devastating act. She was declared dead at the hospital.