शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

१३३ व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार

By admin | Updated: December 6, 2014 00:43 IST

कटू कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी एलबीटी भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन

कोल्हापूर : महापालिका एलबीटी विभाग थकबाकीदार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून सुनावणी शिबिर घेते. अशाप्रकारच्या नोटीस बजावूनही सुनावणीकडे पाठ फिरविणाऱ्या १३३ व्यापाऱ्यांना पाच हजार दंडाची नोटीस आज, शुक्रवारी महापालिकेने बजावली. दंडासह एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मिळकतींवर बोजा चढवून घरफाळ्याप्रमाणे त्याची वसुली करण्याचे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत. कटू कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी एलबीटी भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे.  महापालिका प्रशासनाने डिसेंबर २०१३पासून एलबीटी भरण्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांची बँक खाती गोठविण्यास सुरुवात केली. त्यावर्षी १२ व्यापाऱ्यांना महापालिकेने दणका दिल्यानंतर ६० कोटींची वसुली झाली. गेल्या आठ महिन्यांत महापालिकेने ९०६ व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या. मात्र, ३२५ व्यापाऱ्यांनी हजेरी दर्शवून म्हणणे मांडले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी एलबीटी न भरणाऱ्या ६०० हून अधिक व्यापाऱ्यांची बँक खाती खाती गोठविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतल्यानंतर एलबीटी भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली.यंदाच्या वर्षी महापालिकेला ८३ कोटी रुपये एलबीटीतून जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. अद्याप १५ हजार ३०२ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, दीड हजारांहून अधिक व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे सादर केलेली नाहीत. सहाशेहून अधिक व्यापाऱ्यांनी एलबीटीकडे पाठ फिरविली. त्यातील ५७ व्यापाऱ्यांची बॅँक खाती सहा महिन्यांसाठी सील करण्यात आली. त्यानंतरही १३३ व्यापाऱ्यांनी एलबीटीकडे पाठ फिरविली. अशा व्यापाऱ्यांना पाच हजार रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर या व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून एलबीटीची वसुली केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)