शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळेतील १० हजार ४०० विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे ऑनलाइन शिक्षण पध्दतीचा अवलंब केल्यामुळे आधीच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे ऑनलाइन शिक्षण पध्दतीचा अवलंब केल्यामुळे आधीच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरला आहे, त्यात आता परीक्षाच रद्द केल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतचे १० हजार ४०० विद्यार्थी कोणत्याही मूल्यमापनाशिवाय पुढील वर्गात ढकलले जाणार आहेत.

गेले वर्षभर संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. अनेक महिने शाळाच भरल्या नाहीत. गेल्या दोन-तीन महिन्यापासून त्या सुरू झाल्या आणि कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. शासकीय निर्बंध कडक करण्यात आले. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवी पर्यंतची परीक्षा रद्द केली.

या निर्णयामुळे महापालिकेच्या शाळेतील १० हजार ४०० विद्यार्थी परीक्षांना मुकणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून वर्षभर विद्यार्थी बरेच कष्ट घेत असतात. परंतु ऑनलाइन शिक्षण आणि आता तर परीक्षाच रद्द झाल्याने या गुणवत्तेची ऐशीतैशी झाली आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गच अद्याप सुरू झाले नाहीत. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन लागतो. तो सर्व विद्यार्थ्यांकडे असतोच असे नाही. महापालिकेच्या शाळेतील ५९ टक्के विद्यार्थ्यांकडे असे फोन होते. त्यावर त्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले.

परंतु त्यांच्याकडे फोनच नाहीत त्यांनी पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला. शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले. परंतु प्रत्यक्ष शिकविणे आणि ऑनलाइन शिकविणे यात बराच फरक पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमालीची घसरली आहे, असे शिक्षक सांगतात. केवळ अभ्यासाची सवय तुटू नये म्हणून ऑनलाइन पध्दत अवलंबिली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मू्ल्यमापन तरी कसे करणार? असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत.