शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंध कागदावरच, संचारबंदीचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:07 IST

डाेंबिवलीत संचारबंदीचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन : सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा, कारवाईनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे एप्रिलमध्ये दिसून आले. नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार केडीएमसीने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंधांचे उल्लंघन होताना डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. भाजीपाला विक्री, मच्छी-मटण विक्रेते यांना विक्रीसाठी ठराविक कालावधी ठरवून दिला असताना त्यानंतरही त्यांचे धंदे बिनदिक्कत सुरू राहत असून यात नागरिकही बेफिकिरीने वागत असल्याने कोरोनाचे संक्रमण रोखायचे तरी कसे? असा प्रश्न सरकारी यंत्रणांना पडला आहे.

एप्रिलमध्ये कोरोनाचे तब्बल ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले आहेत. ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले. मात्र, १७८ कोरोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना रुग्ण नव्याने आढळून येण्याच्या आकड्यात काहीशी घट झाली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलमध्ये एका दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वोच्च आकडा आहे. सध्या मृतांचे प्रमाण आठ ते १० च्या आसपास आहे. दरम्यान, सरकारने लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला आहे. 

लादलेले कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र, याचा डोंबिवलीत काहीच परिणाम दिसत नाही. सकाळी ११ वाजल्यानंतरही धंदा चालू ठेवणारे भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, मच्छी-मटण विक्रेते यांच्यावर कारवाई करूनही उघड्यावर किंवा छुप्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. त्याठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक जण विनाकारण फिरत असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळही वाढली आहे. पश्चिमेतील बावनचाळ, पूर्वेतील इंदिरा चौक, मानपाडा चार रस्ता, पाथर्ली शेलार चौक, घरडा सर्कल येथे पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे. त्यानंतरही नागरिकांचे उल्लंघन सुरूच आहे.

वॉक करणाऱ्यांचा बेजबाबदारपणाकाही बेजबाबदार नागरिक सकाळी व संध्याकाळी वॉकच्या नावाखाली सर्रास फिरत आहेत. काहींच्या ताेंडावर मास्कही नसतो. हे चित्र डोंबिवली पश्चिमेतील खाडीकिनारे, भागशाळा मैदान आणि पूर्वेतील उंबार्ली टेकडी तसेच ठाकुर्लीतील ९० फूट रोड, समांतर रस्त्यावर नेहमी पाहायला मिळते. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर मीरा-भाईंदरमध्ये कारवाईचा बडगा नुकताच तेथील मनपा आणि पोलिसांच्या वतीने उगारण्यात आला आहे. डोंबिवलीही कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. त्यामुळे येथेही अशाच प्रकारे कारवाई होऊन संक्रमण रोखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली