शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात झोपडपट्ट्या वाऱ्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 23:46 IST

प्राथमिक सुविधांचा उडाला बोजवारा : ‘इंदिरानगर’मधील रहिवाशांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोरोनाला रोखण्यासाठी केडीएमसीची यंत्रणा व्यस्त असताना दुसरीकडे शहरातील झोपडपट्ट्यांकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. भरलेली गटारे, खड्डे पडलेल्या पायवाटा, वस्तीमधील बंद पथदिवे आणि पडझड झालेल्या बालवाड्या असे पूर्वेतील इंदिरानगर झोपडपट्टीमधील चित्र पाहता याची प्रचिती येते. स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा आणि अंधारामुळे पायपीट करणेही जिकरीचे बनल्याने स्थानिक रहिवाशांत संतापाचे वातावरण आहे.

शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये कचरावेचक, रिक्षाचालक, बिगारी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, फेरीवाले, असे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. मात्र, इंदिरानगर झोपडपट्टीतील अवस्था अत्यंत बिकट आहे. तेथील शौचालयांना दरवाजे नाहीत, तर असलेले काही दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. शौचालयांची नियमित स्वच्छता होत नाही. गटारे तुडुंब भरलेली असल्याने कोरोनाकाळात स्थानिकांना अन्य आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे. अनके ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत असल्याने अपघात होऊन जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडेही लक्ष वेधले जात आहे.

रिपाइंने दिले केडीएमसीला पत्रकोरोनाकाळात झोपडपट्ट्यांकडे झालेले दुर्लक्ष पाहता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवले आहे. झोपडपट्ट्यांमधील समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. कोरोना लसीकरणासंदर्भातही त्यांनी लक्ष वेधले आहे.

लस नोंदणी केंद्र स्थापन व्हावेnकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये मनपाचे समुपदेशन केंद्र असणे गरजेचे आहे. nयाठिकाणी राहणारा वर्ग मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे. कोरोना लसीकरणासाठी गरजेच्या असलेल्या ऑनलाईन नोंदणीबाबत माहितीचा अभाव आहे.nअनेकांकडे अँड्राॅईड मोबाईल नसल्यामुळे त्यांची नोंदणी करताना गैरसोय होत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये लस नोंदणी केंद्र स्थापन करून प्रशिक्षित अधिकारी अथवा स्वयंसेवक यांच्याकडून नोंदणी करणे गरजेचे आहे. आयुक्तांनी यात विशेष लक्ष घालावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या