शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
5
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
6
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
7
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
8
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
9
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
10
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
11
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
12
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
13
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
14
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
15
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
16
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
17
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
18
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
19
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
20
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:36 IST

कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानावर तीन जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कल्याण - कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानावर तीन जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांना दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये काही जण एका प्रवाशाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते तातडीने डब्यात पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी तिघांना चौकशीसाठी फलाटावर उतरण्यास सांगितले. मात्र फलाट क्रमांक चारवर उतरताच आरोपींनी जवान नरेंद्र यादव यांच्यावर हल्ला केला. तिघांनी मिळून त्यांना मारहाण केली.

हा प्रकार पाहून फलाटावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अब्दुल शेख, सलमान शेख आणि सरकार शेख या तिघांना अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली.

या प्रकरणी कल्याण आरपीएफचे प्रभारी अधिकारी पी. आर. मीणा म्हणाले की, प्रवाशांमधील भांडण सोडवताना ही घटना घडली. लोहमार्ग पोलिसांनी तिघांना अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांवरच हल्ला झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking! RPF Jawan Attacked at Kalyan Station, Three Arrested

Web Summary : Three individuals attacked an RPF jawan at Kalyan station after he intervened in a passenger dispute on a train. The attackers were arrested and remanded to judicial custody. The incident raises concerns about railway security.
टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी