शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी, महिन्याभरात होणार कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 17:25 IST

Palawa flyover : या उड्डाणपुलात एकूण ४५ फाऊंडेशन असून त्यापैकी ३७चे काम पूर्ण झाले आहे, तर ४५ पिलरपैकी १२चे काम पूर्ण झाले आहे.

कल्याण : शिळ-कल्याण रस्त्यावरील पलावा परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने मंजुरी दिल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याची माहिती या कामाचा सातत्याने पाठपुरावा करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या उड्डाणपुलाच्या अंतिम आराखड्याला मंजुरी मिळून महिन्याभरात कामाला पुन्हा सुरुवात होईल.

शिळ-कल्याण रस्त्याच्या सहापदारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून याचाच एक भाग म्हणून पलावा गृहसंकुल परिसरात देसाई खाडी ते काटई टोल नाका अशा उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात आले होते. परंतु, या उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अतिरिक्त २ मार्गिकांसाठी जागा सोडण्याची विनंती हे काम करणाऱ्या प्राधिकरणाने केल्यामुळे या उड्डाणपुलाचा आराखडा बदलावा लागला. या उड्डाणपुलात एकूण ४५ फाऊंडेशन असून त्यापैकी ३७चे काम पूर्ण झाले आहे, तर ४५ पिलरपैकी १२चे काम पूर्ण झाले आहे.

आराखडा बदलावा लागल्यामुळे रेल्वेला सर्वसाधारण आराखडा पुन्हा मंजुरीसाठी पाठवावा लागला. याला आता मंजुरी मिळाली असून अंतिम आराखडाही महिनाभरात मंजूर होऊन कामाला सुरुवात होईल. या वर्ष अखेरीपर्यंत पत्री पूल वाहतुकीसाठी खुला होत असून त्याच बरोबरीने पलावा उड्डाणपुलाच्या कामालाही सुरुवात होत असून वाहतुककोंडीतून दिलासा मिळेल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीShrikant Shindeश्रीकांत शिंदे