VIDEO: सोनसाखळी चोरुन तिथेच चोरी करायला आला अन् फसला; अंबरनाथमध्ये पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:28 IST2025-10-04T14:24:05+5:302025-10-04T14:28:48+5:30
Ambernath Chain Snatcher Viral Video: अंबरनाथ रेल्वे स्थानकावर चोरी करुन पळणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी शिताफीने पकडलं.

VIDEO: सोनसाखळी चोरुन तिथेच चोरी करायला आला अन् फसला; अंबरनाथमध्ये पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई
Ambernath Station Crime: अंबरनाथरेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यानीची चेन हिसकावून पळून गेलेला चोर दुसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आला. पण यावेळी जीआरपी आणि आरपीएफ पथकांनी त्याला एका चित्रपटासारख्या सीनप्रकारे पकडले. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चोरट्याला रेल्वे पोलिसांनी चपळता दाखवत रेल्वे ट्रॅकवरच पकडलं.
अंबरनाथ रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी या चोराला फिल्मी स्टाईलने अटक केली. पळून जाताना चोरट्याने रेल्वे रुळांवर उडी मारली होती. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेसमोर उडी मारत त्याला जागीच ताब्यात घेतले आणि अटक केली.या चोराने आदल्या दिवशी चेन स्नॅचिंग करुन पळ काढला होता. मात्र दुसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणी पुन्हा चोरी करण्यासाठी परतला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मुकेश कोळी नावाच्या चोराने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यानीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. विद्यार्थ्यीनीने ताबडतोब जीआरपीकडे तक्रार दाखल केली. ही संपूर्ण घटा स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. चोराने दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरीचा प्रयत्न केला. पण यावेळी, पोलिसांना सतर्कता मिळाली आणि त्यांनी सापळा रचला. चोर पुन्हा साखळी हिसकावून घेण्याच्या तयारीत असताना, त्याला पोलिस जवळ असल्याचे लक्षात आले आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.
चोर रेल्वे रुळांकडे पळाला आणि अडखळून लोकल ट्रेनसमोर पडला. त्याच वेळी जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने त्याला घेरले आणि पकडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.
#Maharashtra: A CCTV footage of #Ambernath Railway Station in #Kalyan, is going #viral, where a thief who was running away after snatching the chain of a college girl was caught in a filmy style, watch the video. pic.twitter.com/nCPeYAVak6
— Siraj Noorani (@sirajnoorani) October 3, 2025
प्राथमिक तपासात मुकेश कोळी गरजेपोटी ही चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याची संपूर्ण हालचाल, साखळी हिसकावून पळून जाणे, हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. चोरी आणि अटकेची संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय बनली आहे.