शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

आता मासिक पाळी आली तरी विद्यार्थींनीची शाळा बुडणार नाही

By मुरलीधर भवार | Updated: March 10, 2026 13:38 IST

या प्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल हे देखील उपस्थित होते.

मुरलीधर भवार, कल्याण : कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या उंबारली येथील उर्दू शाळेत सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन कार्यान्वीत करण्यात आले आहे. या मशिनचे उद्धाटन महापौर हर्षाली चौथरी थवील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या प्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल हे देखील उपस्थित होते.

ही मशीन लोकसहभागातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मशीन कार्यान्वीत केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान आवश्यक सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध होणार आहेत. त्याची सुरक्षित आणि स्वच्छ विल्हेवाट लावण्याची सोयही शाळेतच उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्य संवर्धनास मदत होणार असून त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

महापाैर हर्षाली यांनी सांगितले की, मासिक पाळी स्वच्छता या विषयाबाबत विद्यार्थिनींमध्ये योग्य जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थिनीं बरोबरच त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करणे आवश्यक असून या विषयाबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे आहे. आयुक्त गाेयल म्हणाले की, मुलींच्या शिक्षणामध्ये मासिक पाळीमुळे कोणतीही अडचण निर्माण होता कामा नये. शिक्षण हा त्यांचा मूलभूत हक्क असून त्या दृष्टीने महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तसेच खासगी शाळांनीही आपल्या स्तरावर विद्यार्थिनींसाठी अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, शिंदे सेनेच्या नगरसेविका नमिता पाटील, उद्धव सेनेच्या नगरसेविका तेजस्वी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : मासिक धर्म में स्कूल नहीं छूटेगा: छात्राओं के लिए सैनिटरी पैड सुविधा

Web Summary : कल्याण-डोंबिवली स्कूल में सैनिटरी नैपकिन वेंडिंग मशीनें लगाई गईं, जिससे छात्राओं को मासिक धर्म स्वच्छता तक पहुंच सुनिश्चित हो सके। इस पहल का उद्देश्य सैनिटरी नैपकिन और निपटान सुविधाएं प्रदान करके लड़कियों की शिक्षा और स्वास्थ्य का समर्थन करना है, और मासिक धर्म के प्रति सकारात्मक दृष्टिकोण को बढ़ावा देना है।
टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीStudentविद्यार्थी