शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटी घडवणार कल्याण-डोंबिवली शहरांचे दर्शन; पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 00:08 IST

बस निर्मितीच्या कामाचा शुभारंभ, दर रविवारी ‘मुंबईदर्शन’साठी जशी बस चालविली जाते

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील गडकिल्ले, तलाव, जुनी मंदिरे, स्मारके तसेच विविध प्रकल्प अशा पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी आता केडीएमटी उपक्रमाने कंबर कसली आहे. नागरिकांना या स्थळांना भेट देणे शक्य व्हावे, यासाठी केडीएमटी उपक्रमाकडून पर्यटकांसाठी एक विशेष बस सोडण्यात येणार आहे. या बसचे भाडे नाममात्र राहणार असून, बसच्या निर्मितीच्या कामाचा शुभारंभ परिवहन सभापती मनोज चौधरी आणि सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आला. आगळा वेगळा लूक असलेल्या या बसच्या निर्मितीचे काम ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस’च्या विद्यार्थ्यांकडून केले जाणार आहे.

दर रविवारी ‘मुंबईदर्शन’साठी जशी बस चालविली जाते, त्याप्रमाणे कल्याण-डोंबिवली दर्शन बससेवा सुरू करण्याची मागणी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यावर त्या बसच्या निर्मितीच्या कामाचा शुभारंभ उपक्रमाच्या गणेश घाट आगारात करण्यात आला. यावेळी सभापती चौधरी, सदस्य बंडू पाटील, अनिल पिंगळे, आगार व्यवस्थापक संदीप भोसले आणि अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

कल्याण स्थानक बाहेरून ही बस सोडण्याचे नियोजन आहे. येत्या दहा दिवसांत ही बस उपलब्ध होईल, अशी माहिती चौधरी यांनी दिली. टिटवाळा महागणपती मंदिर, डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान, ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला यांसह अन्य शहरातील महत्त्वाच्या अन्य स्थळांची चित्रे या बसवर साकारली जाणार असल्याने बसला वेगळाच लूक लाभणार असल्याचेही ते म्हणाले. 

काय पाहाल?टिटवाळा महागणपती मंदिर ते कल्याण शीळ मार्गावरील दत्त मंदिर अशी ही बस चालविली जाणार असून या दरम्यानच्या दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी गणेश घाट, बारावे जलशुद्धीकरण केंद्र, काळा तलाव, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, आर्ट गॅलेरी, सुभेदारवाडा, डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर, शहीद कॅप्टन सच्चन स्मारक, शहरालगत असलेले खिडकाळी मंदिर, शीळ फाटा येथील दत्त मंदिर आदी पर्यटन आणि नयनरम्य स्थळांचा यात समावेश आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका