शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘केडीएमटी’ची मुरबाड बस किती बळी घेतल्यावर सुरू होणार? दोन्ही बाजूने एसटीच्या केवळ ३५ फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:20 IST

Kalyan Accident News: मुरबाडला जाण्यासाठी एसटी हाच केवळ सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. कल्याण-मुरबाड मार्गावर कल्याणहून मुरबाडच्या दिशेने आणि मुरबाडहून कल्याणच्या दिशेने ३५ बस फेऱ्या चालविल्या जातात.

कल्याण - मुरबाडला जाण्यासाठी एसटी हाच केवळ सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. कल्याण-मुरबाड मार्गावर कल्याणहून मुरबाडच्या दिशेने आणि मुरबाडहून कल्याणच्या दिशेने ३५ बस फेऱ्या चालविल्या जातात. अर्धा तासाच्या अंतराने बस येते. त्यातच कल्याण- मुरबाड मार्गावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेची बस नसल्याने खासगी वाहनातून मुरबाडला जाण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नाही. त्यामुळे आणखी किती बळी घेतल्यानंतर ‘केडीएमटी’ची मुरबाड बस सुरू होणार?, असा सवाल सोमवारच्या अपघातानंतर विचारला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत (केडीएमटी) कल्याण-भिवंडी, कल्याण-वाशी, कल्याण-बेलापूर, कल्याण-मलंगगड, कल्याण-टिटवाळा, कल्याण- मोहने या मार्गावर बसेस चालविल्या जातात. त्याचप्रमाणे ‘केडीएमटी’ने कल्याण- मुरबाड बससेवा सुरू केल्यास प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो, याकडे उद्धवसेनेचे नगरसेवक संकेश भोईर यांनी लक्ष वेधले. कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम प्रस्तावित आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण झाला तर प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

अहिल्यानगर बसमध्ये प्रवेश नाही मुरबाड मार्गावर कल्याण-अहिल्यानगर बस विठ्ठलवाडी डेपोतून चालविल्या जातात. कल्याण-अहिल्यानगर मार्गावर प्रत्येक १५ मिनिटाला बस आहे. या बस कल्याण- मुरबाडमार्गे अहिल्यानगरला माळशेज घाट पार करून जातात. मात्र, बसमध्ये लांब पल्ल्याचे प्रवासी असल्याने जवळच्या अंतराच्या प्रवाशांना काही वाहक प्रवेश नाकारतात. त्याचप्रमाणे मागून दुसरी बस येत आहे, असे सांगून बसू देत नाहीत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Murbaad Bus Service Delay: How Many More Lives Will It Take?

Web Summary : Commuters struggle between Kalyan and Murbaad due to limited bus service. Residents question KDMT's delayed Murbaad bus launch after a recent accident. Only 35 state transport buses operate daily. A KDMT bus could provide relief.
टॅग्स :state transportएसटीkalyanकल्याणAccidentअपघात