शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

डाेंबिवलीत आणखी चार स्मशानभूमींमध्ये हाेणार काेराेनाच्या मृतांवर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 23:57 IST

विनामूल्य सेवा : तासंतास करावा लागणारा विलंब टळणार

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी, दररोज ८ ते ९ रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच अन्य मृतांचेही प्रमाण पाहता डोंबिवलीतील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विलंब होत असल्याचा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याची दखल घेत टिटवाळा येथे काळू नदीच्या काठावरील स्मशानभूमी, ठाकुर्ली पूर्वेतील चोळे स्मशानभूमी आणि डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव आणि कुंभारखाणपाडा स्मशानभूमीत कोविड मृतांसाठी लाकडावर विनामूल्य शवदाहिनीची सोय करण्याचे आदेश दिली आहेत.

केडीएमसी हद्दीत कोविड मृतांवर अंत्यसंस्कारासाठी कल्याणमधील मुरबाड रोड बैलबाजार, लालाचौकी आधारवाडी, विठ्ठलवाडी, तर डोंबिवलीत शिवमंदिरानजीकची वैकुंठ स्मशानभूमी, पाथर्ली स्मशानभूमी या सहा ठिकाणी गॅस शवदाहिन्यांसह लाकडावरील बर्निंग स्टॅण्डवर विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. मात्र, या स्मशानभूमींवर ताण येत होता. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी विलंब होत होता. याबाबत ‘लोकमत’च्या, ‘हॅलो ठाणे’मध्ये २१ एप्रिलला ‘डोंबिवलीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तासनतास वेटिंगवर’ या मथळ्याखाली नागरिकांची व्यथा मांडणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मनपा प्रशासनाने त्याची दखल घेत आता टिटवाळा, चोळे आणि पश्चिमेतील मोठागाव आणि कुंभारखाणपाडा स्मशानभूमीतही कोविड मृत्यूंसाठी लाकडावर विनामूल्य शवदहनाची सुविधा आता केडीएमसीने उपलब्ध करून दिली आहे.

इतर ठिकाणीही टप्प्याटप्प्याने सुविधाआगामी काळात इतर स्मशानभूमींतही कोविड मृतांसाठी लाकडावर विनामूल्य शवदहनाची सोय‍ टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोविड रुग्णालयात मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नजीकच्या स्मशानभूमीत करण्याबाबत मनपा व खासगी कोविड रुग्णालय प्रमुखांना कळविले असल्याचेही मनपाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या